अधिपरिचारिका स्वाती गवई जिल्हास्तरीय फ्लोरेन्स नाईटिंगेल प्रथम पुरस्काराने सन्मानित

अधिपरिचारिका स्वाती गवई जिल्हास्तरीय फ्लोरेन्स नाईटिंगेल प्रथम पुरस्काराने सन्मानित

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो. 8999904994

गडचिरोली : परिचर्या क्षेत्रात उल्लेखनीय सुश्रुषा सेवा करणाऱ्या परिचारिकांना जगातील पहिली अधिपरिचारिका, आद्य परिचर्ये च्या जनक फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या जन्मदिना निमित्य फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित केल्या जाते. असेच गडचिरोली जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, ज़िल्हा परिषद गडचिरोली तर्फे जिल्हास्तरीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार सोहळ्यात सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील अधिपरिचारिका स्वाती गवई यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद गडचिरोली चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे होते तर मंचावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमित साळवे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ सचिन हेमके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ पंकज हेमके, महिला व बाल रुग्णालय गडचिरोली चे वैद्यकीय अधीक्षक डॉ पेंदाम, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ हुलके, सहाय्यक अधिसेविका आशा बावणे आदी उपस्थित होते.