राकाँपा चे शहराध्यक्ष अमोल कुळमथे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

राकाँपा चे शहराध्यक्ष अमोल कुळमथे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

आमदार डाॅ.धर्मरावबाबा आत्राम यांची प्रमुख उपस्थिती

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अमोल कुळमेथे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्याहस्ते रविवार, 23 मार्च रोजी करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटले कि, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात उत्तम कार्य करीत आहे. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर आहे. गड़चिरोली शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अमोल कुळमेथे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, असेही आमदार आत्राम यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिलाध्यक्ष डॉ.सोनल कोवे, विधानसभा महिला कार्याध्यक्ष सुषमा येवले, युवा नेते अजय कुकडकर, माजी नगरसेवक खुमेश कुळमेथे, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक संघरक्षित फुलझेले, सेवानिवृतत वनपाल बळवंत येवले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुरुषोत्तम कुळमेथे, समीर वानखेडे, किरण मंगरे, पौर्णिमा गडसूलवार, मीना मावळणकर, अनिता नैताम, साक्षी चिचघरे, आशा नलिनी शिंदे, योगिता नैताम, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.