म्हशीवर जादूटोणा केल्याचा अंधश्रद्धेतुन, 6 वर्षीय बालकांची बीड मध्ये हत्या.

बीड :- आज अंधश्रद्धेमुळे अनेक हत्या झाल्याचे रोज कुठे ना कुठे समोर येत असते अशीच एक घटना बीड जिल्हात समोर आली आहे. त्यामुळे अंधश्रद्धेची नाळ किती खोल वर रुजलेली आहे याची प्रचेती येते. म्हशीवर करणी केल्याच्या समजातून सहा वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. बीडमध्ये झालेल्या चिमुकल्याच्या संशयास्पद मृत्यूमुळे काही दिवसांपूर्वी एकच खळबळ उडाली होती. हत्येप्रकरणी चिमुरड्याच्या भावकीतील दाम्पत्यालाच अटक करण्यात आली आहे.
शुभम उर्फ राज सपकाळ हा बालक मृतावस्थेत आढळला होता. बहिणीसोबत जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात खेळण्यासाठी गेलेल्या 6 वर्षीय शुभमच्या संशयास्पद मृत्यूने बीडमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. घाटना नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रत्नागिरी या गावात ही घटना घडली होती.
शाळेच्या जवळच आरोपी राहत असल्याने त्यांनी शुभमला घरी नेले आणि त्याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह गोणीत घालून शाळेजवळ फेकला.
म्हशीवर करणी केल्याचा राग मनात धरुन दाम्पत्याने शुभम सकपाळची हत्या केल्याचा आरोप आहे. घाटना नेकनूर पोलिसांनी शुभमच्या भावकीतील पती पत्नीला आता बेड्या ठोकल्या आहेत.