महाराष्ट्र शासना अंतर्गंत “महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अस्तित्वात असून या मधे या महामंडळाच्या “ऐस.टी बसेस”सेवे मधे तत्तपरतेने कार्यरत आहे.या मधे काही ऐस.टी बसेस अक्षरक्षः जूनाट व भंगार स्वरूपात असून त्या ही रस्त्यावर धावताना दिसत आहे.तर काही साधारणतः मध्यम स्वरूपाच्या ऐस.टी बसेस ही आपला दैनदिंन प्रवास करीत आहे.महाराष्ट्र शासनाच्या नियमानूसार या पूर्वी प्रत्येक ऐस.टी बसेस मधे पाटी लिहिलेली निर्दशंनास येत होती . ती म्हणजे,”लोकप्रतिनिधी,आमदार,खासदार,नगरसेवक,शालेय विद्यार्थी,ज्येष्ट नागरीक,गरोदर स्रिया,व पत्रकार” यांच्या करींता “आसने”राखीव आरक्षित.त्या प्रमाणे या पूर्वी या लोंकासाठी सदर आसने मोकळी असायची.आणि जर कूणी या आसनांवर या पदाच्या मान्यवर व्यक्ती प्रवास करण्यांस आले नाही तर मग त्या ऐस.टी बस मधिल “वाहक”अन्य व्यक्तीला त्या मान्यवरांच्या जागेवर “अटी-शर्तीवर”बसण्याची परवानगी देत असे. पंरतू हल्ली असे होताना निर्दशंनास येत नाही.
आज प्रत्येक ऐस.टी बस मधे मान्यवरां साठी राखीव आरक्षित आसने राखीव ठेवले जात नाही.ही चूकीची पध्दत असून याला “महाराष्ट्र परिवहन महांमडळातील” सर्व वरीष्ट्र पातळीचे अधिकारी जबाबदार असून,दि.22/03/2025,रोजी दूपारी 3.45/4.00,च्या दरम्यान “कोलाड-वरस गांव ते पनवेल”या प्रवासा साठी मी,”मिडिया वार्ता”चा पत्रकार,व माझी पत्नी “MH-20-B-3713,या ऐस.टी बस मधून प्रवास करीत असताना मी त्या बसेस मधे डूयूटीवर असलेल्या “वाहका”ला विचारले की,”पत्रकारा”साठी राखीव ठेवलेले आसन कूठे दिसत नाही.तेव्हा “बसवाहका”ने असे ऊत्तर दिले की,या पूर्वीची पध्दती आता आमच्या वरीष्ट्र पातळीवरच्या अधिकार्यांनी मोडीत काढलेल्या आहेत.आता सरसकट सर्वच आसने “आरक्षित”केल्या जातात. या मधे माझी काही चूक नाही असे तो “बस वाहक”ऊत्तर देवून मोकळा झाला.त्यांनतर काही वेळाने ऐका महीला प्रवाशींच्या पोटामधे जास्त दूःखू लागल्याने त्या अगदी शेवटच्या रागेंच्या आसनावर बसलेल्या असल्याने त्यांना या ऐस.टी बसेसचे जोरदार दणके बसत होते.अश्या वेळी मी,आणी माझ्या पत्नीने त्या “बस वाहका”ला त्या महीलेला पूढील कौणत्याही आसना वर बसण्यासाठी मदत करा.पण त्या बसवाहकाने नकार दिला. ऐकीकडे त्या महीला प्रवाश्यांची पोटामधे दूःखण्याची वेदना वाढत होत्या अश्यावेळी आम्ही दोघा “पती-पत्नीने”या ऐस.टी बस मधे बसलेल्या प्रवाश्यांना दोन्ही हात जोडून विंनती केल्यावर या ऐस.टी बस मधे प्रवाश्यांपैकी काही जणांना “दया”आल्यावर ऐकाने आपले “आसन”रिकामी करून दिले.असे प्रकार “वारं,वार”घडत आहै.पण “महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ”तोंडामधे “मूग”गिळून गप्प बसलेले दिसून येत आहे.
माझी “मिडिया वार्ता”तर्फे मा.मंत्री,श्री प्रतापराव नाईक साहेबांना नम्र विंनती आहे की,या विषया बाबत आपण जातीने लक्ष घालून “महाराष्ट्र राज्य परिवहन महामडंळ”मधिल सर्व ऐस.टी बसेस मधे “सर्व प्रकारचे लोकप्रतिनिधी,ज्येष्ट नागरीक,शालेय विद्यार्थी,गरोदर महीला,व पत्रकारां साठी “राखीव आसने आरक्षित ठेवावी असा आदेश पारीत करून तशी अमंलबाजवणी प्रत्येक “ऐस.टी बसेस”मधे पाट्या लावण्यांत याव्या.तरच सर्वांचा प्रवास सूखाचा होईल.