समुद्रपूर व हिंगणघाट ग्राम पंचायत कर्मचारी युनीयन तर्फे जयंत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
प्रशांत जगताप
हिंगणघाट:- 3 फेब्रुवारीला जयंत पाटील साहेब यांना ग्राम पंचायत कर्मचारी युनियन 4511 तालुका समुद्रपूर व हिंगणघाट तालुका चे वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात ग्राम पंचायत कर्मचारी समस्या बाबत माहिती खालील प्रमाणे देण्यात आले.,
१) ग्राम पंचायत कर्मचारी यांना नगर पालिका व जिल्हा परिषद प्रमाणे वेतन श्रेणी लागू करण्यात यावे.
२) ग्राम पंचायत कर्मचारी यांना निवृत्ती वेतन लागू करणे बाबत.
३) ग्राम पंचायत कर्मचारी यांना उपदान योजना लागु करणेबाबत.
४) मुंबई ग्राम. प. अधिनियम१९५८ चे कलम ६१ मध्ये सुधारणा करणेबाबत.
५) किमान वेतन, राहणीमान भत्ता व इतर शाशन निर्णयाची परिणामकारक अमलबजावनी करणेबाबत.
इत्यादी मागणी चे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना, समुद्रपूर तालुका अध्यक्ष व वर्धा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख अमोल पाझारे, हिंगणघाट तालुका अध्यक्ष बंडू भाऊ खोडे, हिंगणघाट तालुका सचिव भोजराज वावरे , हिंगणघाट उपाध्यक्ष, सूनिलभाऊ उपस्थित होते. व ग्राम पंचायत कर्मचारी यांना न्याय मिळावा म्हणून किन्हाला ग्राम पंचायत चे उपसरपंच, श्री, प्रणय पाटील यांनी प्रामुख्यानं उपस्थिती लावली.