लाचखोर वैद्यकीय अधिकारी एसीबी च्या जाळ्यात
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994
गडचिरोली : एक लाख 30 हजारांची रक्कम लाच म्हणून घेणाऱ्या वैद्यकिय अधिकाऱ्याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाणे पकडले . ही कारवाई दिनांक 26 मार्च बुधवारी लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव संभाजी भोकरे असून प्राथमिक केंद्र लाहेरी येथे कार्यरत होते.
तक्रारदाराच्या फेब्रुवारी २०२४ ते सप्टेंबर २०२४ आणि नोव्हेंबर महिन्यातील १४ दिवसांच्या रोखलेल्या पगाराच्या बिलावर सही करण्यासाठी डॉ. भोकरे यांनी १.५० लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर १.३० लाख रुपयांवर सौदा ठरला. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलीस उपअधीक्षक चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील, शिवाजी राठोड आणि त्यांच्या पथकाने अत्यंत गोपनीय तपास करून सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, आरोपीने लाचेची मागणी केल्यावर तात्काळ कारवाई करत त्याला अटक करण्यात आली. याबाबत गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हा परिसर नक्षल चळवळीने प्रभावित असूनही, पोलिसांनी धाडसी कारवाई केली. या घटनेमुळे भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धडा मिळणार असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना भ्रष्टाचाराविरोधात तत्काळ तक्रार करण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांनी केली आहे.