कमलादेवी शिक्षण महाविद्यालयात प्रवेशोत्सव व अभिमुख कार्यक्रम..
मनोज एल खोब्रागडे
✍🏻सह संपादक✍🏻
मो. 9860020016
चंद्रपूर :- सर्वोदय महिला मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित कमलादेवी शिक्षण महाविद्यालय, बालाजी वार्ड, चंद्रपूर येथील सत्र २०२४-२५ बी. एड. अभ्यासक्रम प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी प्रवेशोत्सव व अभिमुख कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सौ. ममताजी बजाज, मा. श्री भरतजी बजाज (मुख्य कार्यकारी अधिकारी), महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. हेमकांत वाकडे कमलादेवी शिक्षण महाविद्यालय, चंद्रपूर व प्रमुख उपस्थिती म्हणून प्रध्यापिका डॉ. प्रगती बच्चूवार, प्राध्या सूचिता खोब्रागडे, प्राध्या अश्विनी सातपूडके, प्राध्या. डॉ. जयमाला घाटे व शिक्षकेत्तर कर्मचारी ग्रंथपाल श्री. चंदन जगताप, श्री. मोरेश्वर गाऊत्रे, श्री. विजय बाळबूधे उपस्थित होते.
प्रवेशोत्सव व अभिमुख कार्यक्रमा अंतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. हेमकांत वाकडे यांनी विद्यार्थ्यांना भावी आदर्श शिक्षक होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. भरतजी बजाज यांनी नवप्रवेशित छात्रध्यापकाना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन कोलेः संस्थेच्या सचिव मा. सौ. ममताजी बजाज यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना एक उत्तम शिक्षक होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये ध्येय व आत्मविश्वास असणे अतिशय महत्वाचे आहे असे मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच प्राध्या राजकुमार भगत सर यांनी असे सांगितले की, जीवनामध्ये यश संपादन करायचे असेल तर महाचकांक्षा असणे आवश्यक आहे तेव्हाच यशस्वी होता येते त्याचप्रमाणे स्वत मध्ये आत्मविश्वास असेल तरच अशक्य गोष्टी शक्य करता येते. तसेच प्राध्यापिका शमिना अली यानी विद्यार्थ्यांना जीवनामध्ये ध्येय निश्चित असेल तर सहजपणे लक्ष्य प्राप्त करता येते असे मोलाचे मार्गदर्शन केले. बी. एड. द्वितीय वर्षीय छात्रध्यापकांनी स्वागत गीत सादर केले, तसेच बी. एड् द्वितीय वर्षीय छात्रध्यापिका स्नेहल प्रभुणे यांनी गीत सादर केले. बी. एड. द्वितीय वर्षीय छात्रध्यापकांनी प्रथम वर्षीय छात्रध्यापक व छात्रध्यापिकांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देवून स्वागत केले, कार्यक्रमात बी एड् प्रथम व बी. एड् द्वितीय वर्षीय छात्रध्यापक व छात्रध्यापिका यांनी संगीत खुर्ची, क कॅट वॉक, बौध्दिक खेळ अशा विविध खेळामध्ये सहभाग घेतला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियंका पालेकर बी. एड्. द्वितीय वर्षीय छात्रध्यापिका यानी केले. सुत्रसंचालन गौतमी रायपूरे व आभार प्रदर्शन सुप्रिया साखरकर बी एड् द्वितीय वर्षीय छात्रध्यापिका यांनी केले.
प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपला परिचय दिला व बी एड करण्याचे ध्येय यावर आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमात बी एड्. प्रथम व द्वितीय वर्षीय छात्रध्यापक व छात्रध्यापिका उपस्थित होते.