भारतीय जनता पार्टी हिंगणघाट तालुक्याच्या वतीने वीज महावितरण कंपनीला निवेदन.
दिनांक 05 फेब्रुवारी ला कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी हिंगणघाट तालुक्याच्या वतीने वीज महावितरण कंपनीला निवेदन देण्यात आले.
प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी
हिंगणघाट:- महाराष्ट्र राज्यातील माहे मार्च 2020 पासून ते आजपर्यंत कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन लागू असल्यामुळे जनतेला घरातच राहावे लागत होते त्यामुळे सर्वांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कोलमडली होती तसेच कोरोणा काळातील चार महिन्याअसून शेतकरी शेतमजूर कामगार व्यवसायिक व मध्यमवर्गीय जनता कामे नसल्यामुळे हवालदिल झालेली होती त्याच कारणामुळे सद्यस्थितीत जनतेवर उपासमारीची वेळ आली असून जनता शासनाकडे मदतीची वाट पाहत आहे व आज रोजी महावितरणने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याचे नोटीस पाठवून चार कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप महावितरण कंपनी व आघाडी सरकार करीत आहे तरी मध्य प्रदेश शासनाने ज्याप्रकारे प्रतिमहिना फक्त 100 रुपये वीजबिल प्रत्येक वीज धारकास आकारले आहे त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा तोच निर्णय घेण्यात यावा परंतु तसे न झाल्यास शेतमजूर, कष्टकरी मजुरांचे घरगुती व शेतीपंपांची वीज कनेक्शन कापल्यास भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून यापेक्षा उग्र आंदोलन करतील व वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वीज कनेक्शन कापण्यास मज्जाव करेल.व या काळात काही विपरीत घडल्यास सर्वस्वी जबाबदार शासन व वीज वितरण कंपनीचे कर्मचारी यांची राहतील.