माथेरानमध्ये प्रथमच महिला कुस्तीच्या आखाड्यात

माथेरानमध्ये प्रथमच महिला कुस्तीच्या आखाड्यात

 

✍🏻 श्वेता शिंदे ✍🏻
माथेरान शहर प्रतिनिधी
मो.8793831051

माथेरान :- माथेरान मधील ग्रामस्थ उत्सव मंडळ यांच्या वतीने गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत वसंतोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्याअंतर्गत येथे परंपरेनुसार मराठमोळा अस्सल मातीतील कुस्ती या खेळाचे आयोजन करण्यात आले होते.या खेळात प्रथमच मुलींनी या स्पर्धेत भाग घेऊन या कार्यक्रमाची रंगत वाढवली.

                     येथील श्रीराम मंदिर येथे दुपारी चार वाजता जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.सुरुवातीची कुस्ती श्रीफळ आणि रोख रक्कम देऊन झाली.शालेय विद्यार्थ्यांनी या कुस्तीत सहभाग नोंदवला.विशेष म्हणजे लहान मुलींनीही सहभाग घेऊन मैदानावर आपला अधिकार गाजवला.हेदवली येथील पैलवान मुलगी आणि माथेरान मधील पैलवान मुलगी यांच्या लढत झाली यामध्ये हेदवली येथील मुलगी विजयी झाली.सर्व क्षेत्रात मुली कमी नाहीत हे कुस्तीच्या आखाड्यात दाखवून दिले.जसजसा वेळ जाऊ लागला तसतसे मोठ्या गटाच्या कुस्त्या देखील झाल्या.सातारा,सांगली,कोल्हापूर,ठाणे जिल्हा,पुणे तसेच राजस्थान येथून पैलवान मोठ्या प्रमाणात आले होते.

                   याप्रसंगी ग्रामस्थ उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सुतार,चंद्रकांत जाधव,अनंता शेलार, विठ्ठल पवार यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली तर आर्थिक पाठबळ देण्यासाठी शिवसेवा शिंदे गट शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी,उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख कुलदीप जाधव,भाजपचे प्रदीप घावरे व अन्य नागरिक उपस्थित होते.