पाणी टंचाई समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन
त्रिशा राऊत नागपुर क्राइम रिपोर्टर मो 9096817953
कुही.: आजणी येथील पाणी टंचाईच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गावातील पाणी टंचाईच्या तीव्रतेकडे लक्ष वेधण्यात आले तसेच यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या दृष्टीने विचारमंथन झाले. बैठकीला स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणी टंचाई दूर करण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा झाली. उपस्थितांनी प्रशासनाकडेतातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. आमदार संजय मेश्राम यांनी या बैठकीत ठरलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.