सिरोंचा येथे भाजपा स्थापना दिन साजरा
माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले
पक्ष संघटन मजबूत करून पक्षाचे कार्य तळागळात पोहचवावा
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994
सिरोंचा :- भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्य सिरोंचा तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्याने सिरोंचा शहरातील एकता चौक येथे झेंडावंदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानिमित्याने झेंडावंदन कार्यक्रम माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. उपस्थित कार्यकर्त्यांना भाजपा पक्षाच्या स्थापनेचे व पक्षाच्या कार्यपद्धतीचे महत्व पटवून दिले. ध्वजारोहणानंतर शासकीय विश्रामगृहात पक्षाची पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. यावेळी ते बोलताना म्हणाले की जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या आपल्या भारतीय जनता पक्षाचा ४६ वा स्थापना दिन संपूर्ण देशभरात साजरा केला जातो आहे. भाजप पक्षाची कार्यशैली, संघटनात्मक बांधणी, व कार्यकर्त्यांची जबाबदारी तसेच पक्षाचे बळ हे कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळेच वाढते. सोबतच प्रत्येक कार्यकर्त्यांने पक्षाच्या विचारधारेशी बांधील राहून कार्य करत रहावे. व पक्ष संघटन मजबूत करून पक्षाचे कार्य तळागळात पोहचवा असे मार्गदर्शन केले. तसेच प्राथमिक सदस्य नोंदणी, सक्रिय सदस्य, बूथ समिती गठीत करणे याचा आढावा घेतला.
यानंतर माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी व प्रदेश सचिव रमेश भुरसे यांच्या उपस्थित तालुका अध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेसाठी बैठक घेण्यात आली. बंद खोलीत एक एक कार्यकर्त्यांना बोलावून काम करणाऱ्या उमेदवाराचे आपल्या पसंतीचे तीन नावे सुचवण्यात सांगितले. या प्रक्रियेत कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. व उमेदवारांचे नाव सुचवले त्यामधून वरील सर्व नावे वरिष्ठांकडे पाठवून योग्य उमेदवाराची चाचपणी करून तालुकाध्यक्षांचे नाव लवकरात लवकर सुचवण्यात येईल असे कळविण्यात आले.
तदनंतर स्थापना दीनानिमित्य आज ‘मजबूत संघटन ऑनलाइन कार्यकर्ता संमेलन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शासकीय विश्राम गृह सिरोंचा येथे कार्यकर्त्यांनी थेट प्रक्षेपण द्वारे सामूहिक रित्या बघितला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, भाजपंचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावणकुळे, भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आदिनी १२ लाख कार्यकर्त्यांसोबत ऑनलाइन संवाद साधला व मार्गदर्शन केले.
या बैठकीला माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी, किसान मोर्चा प्रदेश सचिव रमेश भुरसे, प्रदेश सदस्य सत्यनारायण मंचलवार, अविनाश विश्रोजवार, जिल्हा उपाध्यक्ष दामोधर अरगेला, जेष्ट नेते रहीम भाई शेख, तालुकाध्यक्ष शंकर नरहरी, तालुक महामंत्री श्रीनाथ राऊत, जिल्हासचिव संदीप राजर्लावार, रामन्ना कडार्ला, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमित तिपट्टी, संपत दाया, शरिक शेख, चटन्ना सदनापू, राजेश संतोषवार, मलन्ना संगती, दिलीप सेनीगारकू, राजन्ना इंगेली, नागेश तडबोइना, सतीश गांजीवार, राजू पेदापल्ली, देवकुमार रंजुवार, शामसुंदर मेचीनेनी, श्रीकांत सुगवार, चंद्रशेखर गट्टू चेमकरी, सतीश पद्मटेंटी, माधव कासर्लावार, लचांन्ना, रमेश मारगोनी, तुषार येंडे, तिरुपती नुसेट्टी, अशोक शामला, जितेंद्र जाडी, मनोज मुलगिरी, आदी बहुसंख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.