अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस 20 वर्ष कारावास

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस 20 वर्ष कारावास
त्रिशा राऊत नागपुर क्राइम रिपोर्टर
मो 9096817953

भिवापूर :- भिवापुर.घरी एकटीच असलेली मुलगी पाहून एका नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार आरोपी अविनाश एकनाथ मांढरे याने वारंवार केला. परिणामी मुलगी गर्भवती झाली अन् पुढे तिने मुलीला जन्म दिला.

याप्रकरणी भिवापूर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात दाखल करण्यात आला होता. अतिरिक्त

जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी अविनाश एकनाथ मांढरे यास ३७६ (३) अन्वये २० वर्षे कारावास व दहा हजाराचा दंड ठोठावला.

भिवापूर पोलिस स्टेशन अंतर्गत डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२

या काळात नराधम अविनाश एकनाथ मांढरे याने अल्पवयीन मुलीला कामसांगतो, असा बहाणा करीत तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार त्याने वारंवार केल्याने मुलगी गर्भवती राहीली. पण यामुळे मुलीच्या मनावर परिणाम झाला. अखेर तिने धाडस करून भिवापूर पोलिसांकडे धाव घेतली. ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक शीतल खोब्रागडे यांनी याप्रकरणाचा संपूर्ण तपास केला. त्यांनी पूर्ण पुरावे गोळा करीत अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. त्याच आधारावर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस. ए. श्रीखंडे यांनी आरोपी अविनाश एकनाथ मांढरे याला या प्रकरणात दोषी ठरवितत्याला २० वर्षांचा कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारच्या वतीने अॅड. व्ही. डब्ल्यू. बालपांडे यांनी युक्तीवाद केला. तर त्यांना कोर्टाच्या कार्यात पोलिस उपनिरीक्षक तुलाराम खडसे यांनी सहकार्य केले.