खातगाव परीसरात अवैध रेती ची वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

खातगाव परीसरात अवैध रेती ची वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त

जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
8806689909

सिंदेवाही:- सिंदेवाही तालुक्यामध्ये अवैध रेती चोरी होऊ नये याकरिता महसूल विभागाने पोलीस विभागाच्या सहकार्याने भरारी पथक स्थापन केले आहे. याच भरारी पथकाने सिंदेवाही तालुक्यातील खातगाव येथे शुक्रवारी रात्री 1.30 वाजता रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त केला. भरारी पथकास गस्ती दरम्यान खातगाव येथील उमा नदी घाटामध्ये लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर आणि क्रमांक नसलेली रेती भरलेली ट्राली आढळून आली. सदर वाहन थांबवून वाहनाचे निरीक्षण केले असता त्यामध्ये 1 ब्रास रेती आढळून आली. पथकाने ट्रॅक्टर चालकाकडे रेती परवान्याबद्दल विचारणा केली असता कोणताही वैध परवाना नसल्याचे चालकाने सांगितले. त्यामुळे अवैध रेती वाहतूक करत असल्याने ट्रॅक्टर सिंदेवाही तहसील कार्यालयात जमा करण्यात आला असुन
सदर ट्रॅक्टर वर दंडात्मक कारवाई करण्यासाठी सिंदेवाही तहसीलदार यांनी प्रस्ताव उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्याकडे पाठवला आहे.
सदर कारवाई तहसीलदार संदीप पानमंद यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार मंगेश तुमराम, महसूल सेवक तुलसीदास गेडाम, शिपाई चक्रधर गेडाम आणि पोलीस कर्मचारी नारायण येग्गेवार यांनी केली आहे.