डॉ. रेहाना घट्टे यांना ‘भारत निर्माण योगदान’ पुरस्कार
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग येथील सौंदर्यतज्ज्ञ व त्वचारोग तज्ज्ञ डॉ. रेहाना घट्टे यांना नुकताच ‘भारत निर्माण योगदान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. गोव्याच्या पणजी येथील मॅक्विन्स पॅलेस येथे पार पडलेल्या या प्रतिष्ठित सोहळ्यात गोवा विधानसभेचे अध्यक्ष आणि आमदार डॉ. रमेश तावडकर यांच्या हस्ते डॉ. घट्टे यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी आमदार डेलिला लोबो व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, तसेच पनाजीचे पोलीस अधीक्षक आणि पी.आय. कावळेकर यांची विशेष उपस्थिती लाभली.
सौंदर्य आणि आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून आरोग्यविषयक शैक्षणिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल डॉ. रेहाना घट्टे यांना हा सन्मान देण्यात आला.
त्यांच्या या यशामुळे अलिबागसह संपूर्ण कोकणवासीयांचा अभिमान वाढला आहे.