नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या वृत्तीनेडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी…..
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग :- नेहरू युवा केंद्र,रायगड- अलिबाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या सहकार्याने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली. नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी निशांत रौतेला, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेचा समारोप आंबेडकर चौकात करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमास प्रकाश वाघ जिल्हा क्रीडा अधिकारी,अंकिता मयेकर तालुका क्रीडा अधिकारी, तपस्वी नंदकुमार गोंधळी – राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार तथा अध्यक्षा रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग,
संदीप वांजळे क्रीडा मार्गदर्शक,
संदीप गुरव सहाय्यक विकास क्रीडा अधिकारी, देवा पाटील सहाय्यक विकास क्रीडा अधिकारी, प्रफुल पाटील लिपिक यांसह नेहरू युवा केंद्रांचे सहकारी तसेच स्पर्धा विश्व अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते.
Home latest News नेहरू युवा केंद्र, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या...