टोळ खुर्द येथे सामाजिक सभागृह लोकार्पण व बुद्धमुर्ती प्रतिस्थापना सोहळा…
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड:- टोळखुर्द बौद्धजन सेवा संघ (रजि.) यांचे विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ जयंती निमित्ताने दि. १३एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सामाजिक सभागृहाचे लोकापर्ण माजी आमदार श्री शामभाई सावंत यांचे हस्ते करण्यात आले. बुध्द मुर्तिची प्रतिस्थापना मा. भदंत प्रज्ञावंत विन्यसन यांचे शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशपाल शंकर साळवी, स्वागताध्यक्ष नितीन राजेंद्र साळवी होते. प्रमुख उपस्थिती मूर्तिदाते उद्योजक नरेश रामा अहिरे, उपसभापती बो. प. स मुंबई विनोद मोरे, उप-कार्याध्यक्ष बौ.प.स.मुंबई चंद्रमणी तांबे, गट नेते गोवा विकास गायकवाड रायगड गटप्रतिनिधी भूपेंद्र सवादकर, समाज सेवक विलास लोखंडे, टोळखुर्द सरपंच सौ. आरती सुतार, उद्योजक अभिजित कांबळे, वंचित ब. आघाडी माणगांव तालुका अध्यक्ष रोहन साळवी, जेष्ठ समाजसेवक सदानंद येलवे, माणगांव गटशिक्षणाधिकारी सौ. सुरेखा तांबट, कुंदन हाटे, बौ.प.स.नांदवी विभाग अध्यक्ष बळीराम मोरे, मुंबई विभाग अध्यक्ष संतोष साळवी,चंद्रमणी साळवी अध्यक्ष गोरेगाव विभाग चंद्रमणी साळवी, मोलाचे सहकार्य मिळाले ते उद्योजक संजय मोरे, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मंगेश भिकाजी साळवी गुरुजी यांनी केले. सोबत विनय साळवी, सुशिल भारत साळवी यांनी सुद्धा सूत्र संचलन केले. राजाराम काळू साळवी यांचे हस्त धम्माचे ध्वजारोहण करण्यात आले. संपूर्ण टोळ ग्रामस्थ यांनी सहभाग घेतला.
रात्री कव्वालीचा जंगी सामना आयोजित करण्यात आला होता. विजय खैरे आणि पार्टी x कु. तेजल जाधव आणि पार्टी यांच्या बहुरंगी सामन्यांचा प्रेक्षकांनी आनंद घेतला. सर्व रसिकजन सकाळी ६ वा. पर्यंत हजर होते. विशेष बाब दलित मित्र दादासाहेब मर्चडे, ॲड. बिपीन साळवी यांनी उपस्थिती दाखवली.माणगाव, महाड,म्हसळा,मंडणगड, मुंबई येथील लोक बहुसंख्येने उपस्थित होते. शेवटी अध्यक्ष यशपाल साळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.