अलिबागच्या ज्येष्ठ नागरिकांची….
निसर्गाच्या सानिध्यात दक्षिण काशी हरिहरेश्वर सहल.
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग :- आयुष्याचा एक सुखाचा क्षण निसर्गाच्या सानिध्यात कुठेतरी जेष्ठ नागरिकांसोबत घालवून मनाचा आनंद घ्यावा यासाठी ज्येष्ठ नागरिक संस्था भालनाका- अलिबाग या संस्थेने जेष्ठ नागरीकांसाठी एका सहलीचे आयोजन रायगड जिल्हयामधील श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे श्री हरिहरेश्वर या धार्मिक आणि ऐतिहासिक अशा पवित्र तिर्थक्षेत्री आयोजित करण्यात आली होती.
सहलीमध्ये एकूण ३० महिला पुरुष जेष्ठांनी सहभाग घेतला. याप्रसंगी जेष्ठांमध्ये वयाचे भान विसरून मनाची शक्ती प्रभावीपणे जाणवत होती.
अध्यक्ष श्रीरंग घरत यांच्या मार्गदर्शनपर मोहन माळी, अरुण पाटील, हरिश्चंद्र सानकर यांचे सहलीला नेतृत्व लाभल्याने सहलीची व्यवस्था आखण्यात आली होती. सहलीमध्ये सहभागी झालेल्या जेष्ठांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली होती. म्हणूनच आपल्या आयुष्यातील संध्याकाळ मजेत व आनंदात घालविली.
सहलीची सुरुवात भालनाका -अलिबाग येथून अध्यक्ष श्रीरंग घरत यांनी श्रीफळ वाढविले आणि नंतर बस प्रवास अलिबाग-कार्लेखिंड मार्गे मार्गक्रमण करीत नागोठण्याच्या डोंगर झाडीतून निसर्गाच्या सानिध्याच्या दिशेने सुसाट प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर मुंबई-गोवा रोडने माणगाव मार्गे नास्ता व चहाचा आस्वाद घेतल्यानंतर माणगाव तालुक्यातील मुगवली येथील स्वयंभू श्री गणपतीचे दर्शन घेतले व बस हरिहरेश्वर या तिर्थक्षेत्राकडे निघाली. बस दऱ्याखोऱ्यातून झाडी-झुडपातून, कडे-कपाऱ्यांमधून, अतिशय आल्हाददायक वातावरणात, वेळेवाकड्या घाटातून, तसेच जंगलांच्या झाडीतून नागमोडी वळणे घेत घेत श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे पोहोचलो.
हरिहरेश्वर हे महाराष्ट्रातील, रायगड मधील, श्रीवर्धन येथील एक धार्मिक व ऐतिहासिक तिर्थक्षेत्र आहे. येथे शिवाचे मंदिर आहे. हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते हरिहरेश्वर गावाला शांत, स्वच्छ व नयनरम्य निळाभोर समुद्र लाभला आहे. हे गाव घनदाट व हिरवीगार झाडी तसेच ब्रम्हगिरी विष्णूगिरी, शिवगिरी व पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आणि नारळ-सुपारीच्या बागामध्ये वसलेले आहे. येथील वातावरण अत्यंतहरिहरेश्वर हे महाराष्ट्रातील, रायगड मधील, श्रीवर्धन येथील एक धार्मिक व ऐतिहासिक तिर्थक्षेत्र आहे. येथे शिवाचे मंदिर आहे. हे ठिकाण दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते हरिहरेश्वर गावाला शांत, स्वच्छ व नयनरम्य निळाभोर समुद्र लाभला आहे.
सर्वसाधारणपणे प्रथम कालभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करुन परत कालभैरवाचे दर्शन घ्यावे. अशी येथील प्रथा आहे. प्रचिलित प्रथेनुसार दोन्ही देव दर्शन घेतल्यानंतर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकावरून जातो. मार्गावरील शे-दिडशे पायऱ्या खाली उतरुन काहींनी त्या डोंगराची प्रदक्षिणा केली.
याचसहलीमध्ये माधवी माळी, अपर्णा घरत, सुचिता सानकर, अनिषा पाटील, अँड. प्रकाश कानडे, अनुराधा कानडे, तुकाराम म्हात्रे, मधुकर पाटील, गजानन पाटील, पौर्णिमा मलये, माधवी घरत, दिपाली पाटील, दिगंबर पाटील, नवीन राऊत, निविता राऊत, चंद्रभागा म्हात्रे, सिताबाई घरत, विद्याधर पैठणकर, नेहा पैठणकर, बाबू म्हात्रे, नामदेव सानकर, सुभाष पडते, महेंद्र म्हात्रे, कल्पना म्हात्रे या सर्वाच्या सहकार्यामुळेच सहल यशस्वीरित्या पार पडली.
अलिबागला सुखरूप येऊन पोहोचलो.
मनाची ईच्छा असेल तर परमेश्वराची साथ नक्की मिळते. सर्वाना या उतारवयात श्री क्षेत्र हरिहरेश्वर चे दर्शन झाले यातच सर्व जेष्ठांमध्ये आनंद होतो.