चक्रीवादळामुळे महाकाली कॉलरी रोड वरील रमाई नगरातील घरांची मोठी हानी

चक्रीवादळामुळे महाकाली कॉलरी रोड वरील रमाई नगरातील घरांची मोठी हानी

रमाई नगरातील घरांची हानी कळवून देखील प्रशासना कडून कोणत्याही प्रकारची ना मदत व ना पंचनामे

मनोज एल खोब्रागडे
✍️सह संपादक✍️
मो . 9860020016

चंद्रपूर :- सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे आहे की काल दिनांक 18/04/2025 रोज शुक्रवार ला दुपारी दोन ते तीन च्या दरम्यान संपूर्ण चंद्रपूर मध्ये महाभयंकर असा एक चक्रीवादळ आल्यामुळे चंद्रपूर मधील बहुतेक भागातील मोठं मोठी झाडे रोड वर पडली तर काही झाडे कोणाच्या घरांवर देखील पडली ,लहान घरे देखील उध्वस्त झाली, घरावरील पत्रे देखील उडून गेली . तशीच हानी
महाकाली कॉलरी रोडवरील रमाई नगरावर देखील आली अगोदरच येथील वासीय रोज मजुरी करून खाणारे आहेत आणि अशा परिस्थितीत ही नैसर्गिक आपत्ती मुळे झालेली हानी कसे सहन होणार हेच येथील वासीयांना मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे . काल दुपारी ही घटना झाल्यानंतर रमाई नगरातील वासीयांनी चंद्रपूर महानगर पालिका प्रशासन व विद्युत केंद्रांना माहिती दिलेली होती परंतु त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी येवून रोडवरील पडलेली झाडे कटिंग करून मार्ग मोकळा करून दिला पण कोणत्याच प्रकारचा पंचनामा केला नाही किंवा कोणताच अधिकारी , आमदार ,खासदार, व कोणताच नेता रमाई नगरला यांनी भेट दिली नाही . तरी सर्व आमदार, खासदार, महानगरपालिका, व प्रशासन यांना या बातमी द्वारे कळविण्यात येत आहे की रमाई नगरातील जनतेची विनंती आहे की रमाई नगरातील लोकांच्या घराची जी हानी झालेली आहे त्यांचे पंचनामे करून प्रशासनाकडून मदत मागवून द्यावी .