स्व.आद्य नाईक यांच्या जन्मदिनी घेण्यात आली बैलगाडी शर्यत;जान्हवी सुर्वे यांची बैलगाडी प्रथम

स्व.आद्य नाईक यांच्या जन्मदिनी घेण्यात आली बैलगाडी शर्यत;जान्हवी सुर्वे यांची बैलगाडी प्रथम

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- अलिबाग रायगड हौशी संघटना सारळपुल आणि अमितदादा मित्र मंडळाच्या वतीने सारळ समुद्रकिनाऱ्यावर स्व.
आद्य नाईक यांच्या जन्मदिनी घेण्यात आलेल्या बैलगाडी शर्यती मध्ये जान्हवी सुर्वे यांची बैलगाडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.
आद्य नाईक स्मृती प्रतिष्ठान पुरस्कृत पारंपरिक हौशी बैलगाडा संघटना व अमित नाईक मित्र मंडळ यांच्या सौजन्याने बैलगाडा स्पर्धेचे आयोजन अलिबाग सारळ येथे दि. १९ एप्रिल रोजी करण्यात करण्यात आले.या स्पर्धेत प्रथम क्रमांकास ५० हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास ३५ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह व तृतीय क्रमांकास २५ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे पारितोषिकाचे स्वरूप ठेवण्यात आले.
अलिबाग येथे वर्षानुवर्षे ही पारंपरिक हौशी संघटना आद्य नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या मागणीनुसार स्पर्धा दरवर्षी भरविण्यात येते ही बैलगाडा स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कार्यकर्ते व नागरिक व स्पर्धक यांचे चांगले सहकार्य मिळाल्याचे अमित नाईक सांगितले.या स्पर्धेत अनेक बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.यावेळी प्रकाश ठाकूर, दिलीप राऊत,बैलगाडा रसिक व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.