जनसुरक्षा विधेयकाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर शे.का.प. चां मोर्चा
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2025 हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक आहे.जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे.हे विधेयक रद्द करावे,या मागणीसाठी राज्यभर व्यापक लढा उभारण्याचा निर्धार महाविकास आघाडीतील घटक पक्ष तसेच भाकप, माकप, भाकप माले, शेकाप, सकप, लाल निशाण पक्षांसह विविध डाव्या व लोकशाहीवादी पक्ष संघटनांनी केला आहे.
याच पार्श्वभूमीवर मंगळवार दि.22 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली या जनसुरक्षा विधेयकाविरोधात मोर्चा काढण्यात आला शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.मोर्चा शेतकरी भवन येथून निघत्यानंतर एसटी स्थानक, महावीर चौक, बालाजी नाका, मारुती नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, उल्का महाजन, चित्रलेखा पाटील, सुरेंद्र म्हात्रे,अॅड मानसी म्हात्रे याची उपस्थिती होती .तसेच शेकडो कार्यकर्ते या वेळी मोर्चा मध्ये सहभागी झाले होते.