बैलगाडा शर्यतीसाठी आता हेल्मेट सक्ती

बैलगाडा शर्यतीसाठी आता हेल्मेट सक्ती

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग :- बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात होऊन बैल गाडा चालकांना गंभीर दुखापत झाल्याच्या घटना घडल्यात. त्यामुळे या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात बैलगाडा चालकांना हेल्मेट सक्ती करण्यात आलीय. मात्र अनेक बैलगाडा चालकांकडून संघटनेच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून जीव धोक्यात घालून बैलगाडा हाकण्याचं काम सुरु आहे. त्यामुळे आता संघटनेने कठोर निर्णय घेत हेल्मेट न वापरणाऱ्या बैलगाडा चालकांना शर्यतीत बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप माळी यांनी दिली .