नगरपरिषद कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरु
प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने तीव्र नाराजी
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- उरण, कर्जत, खोपोली नगर परिषदेमधील कंत्राटी कामगारांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
किमान वेतन कायद्यानुसार किमान वेतन मिळाले पाहिजे. कायद्यातील तरतूदीनुसार, भविष्य निर्वाह निधीची रक्कम दर महिन्याला भरणे आवश्यक आहे. दैनंदिन कामे करताना आवश्यक गणवेश, रेनकोट, गमबुटांसह इतर साधन सामुग्री मिळावी. बोनसची रक्कम वेळेवर मिळावी अशा अनेक मागण्यांबरोबरच खोपोली, कर्जत, उरण या तिन्ही नगर परिषदांमध्ये कंत्राटी सफाई कामगारांना न्याय न देण्याच्या नकारार्थी भुमिकेविरोधात लढा सुरु केला आहे. आयुक्त तथा संचालक, नगरपालिका प्रशासन संचालयानाने निर्गमित केलेल्या परिपत्रकांचा अवमान करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई न केल्याने आमरण उपोषण सुरु केले आहे. म्युनिसिपल एम्लॉईज युनियनच्यावतीने हे उपोषण सुरु केले आहे.