पंचतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. विजय सुदाम तोडणकर यांना आदर्श समाजसेवक पुरस्कारने सन्मानित

पंचतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. विजय सुदाम तोडणकर यांना आदर्श समाजसेवक पुरस्कारने सन्मानित

✍️सचिन सतिश मापुस्कर✍️
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
8698536457

दिघी :- दिनांक १६ एप्रिल २०२५ रोजी दैनिक मिडिया वार्ता न्यूज यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव 2025 निमित्त श्रीवर्धन तालुक्यातून आदर्श समाजसेवक पुरस्कार पंचतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. विजय सुदाम तोडणकर साहेब यांना पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमास उपस्थित माजी खासदार व लोकनेते श्री रामशेठ ठाकूर साहेब त्याचबरोबर माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री.संजय बांगर साहेब यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
माननीय तोडणकर यांच्या लग्ना नंतर सात वर्षांतच त्यांच्या पत्नी चे हृदय विकाराने आकस्मिक निधन झाले. तरीही खचून न जाता आपल्या पाच वर्षाच्या छोट्या मुलीचे व्यवस्थित संगोपन करून आपल्यावर जी वेळ आली ती गोरगरीब जनतेवर येऊ नये, म्हणून श्रीवर्धन, म्हसळा माणगांव, मुरुड तालुक्यातील लोकांना स्वखर्चाने माणगाव, पनवेल, पुणे,नवी मुंबई व मुंबई येथे उपचारासाठी सतत प्रयत्नशील राहून आजतागायत लोकांची सेवा करत आहेत.तसेच श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून ही आज पर्यंत कार्यरत आहेत. त्याच प्रमाणे पंचतन शिक्षण संस्था दिवेआगर चे ही अध्यक्ष म्हणून सतत 30 वर्ष कार्यरत आहेत. संस्थेच्या शाळेत नाविन्य पूर्ण उपक्रम दरवर्षी होत असतात.शाळेतील मुलांना नेहमी सहकार्य करत असतात. वि. वि. का. सेवा सह. सो. लि. दिवेआगरचे 10 वर्ष चेअरमन म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. दिवेआगर ग्रामपंचायत मध्येही 2012 ते 2017 पर्यंत उपसरपंच म्हणून काम पाहिलं आहे.त्या वेळी त्यांनी दिवेआगरच निसर्गसौन्दर्य व भौगोलिक संतुलन बिघडू नये व स्थानिकांना व्यवसायामध्ये स्थान मिळवून देण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. या संदर्भातील कौतुक युक्त चर्चा नेहमीच दिवेआगर व परिसरामध्ये ऐकावयास मिळते. श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील भंडारी समाज एकत्रित करून संघटना बांधण्यामध्ये श्री. तोडणकर यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. सतत 21 वर्ष श्रीवर्धन/म्हसळा अखंड भंडारी समाज संघाचे कार्याध्यक्ष म्हणून समर्थपणे काम पाहिले. धार्मिक क्षेत्रामध्येही महत्वपूर्ण योगदान त्यांनी दिलेले आहे. त्यामुळेच समाजात व पंचक्रोशीत विजय तोडणकर यांचे नाव सर्वतोपरी गाजत असते.अशा व्यक्तीला दैनिक मिडीया वार्ता ने सन्मानित करून दिवेआगर करांची मान उंचावली आहे. कार्यक्रमाला वि.गो. लिमये विद्यामंदिर दिवेआगर मधील मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक त्याचबरोबर गावातील बरेचसे मान्यवर उपस्थित होते.