(सी अँड डी) मलबा व्यवस्थापन – नागपूर शहर याविषयावर वनामतीच्या सभागृहात चर्चासत्र
✍🏻मंजुषा सहारे✍🏻
नागपूर शहर प्रतिनिधी
मो. 9373959098
नागपूर :- सविस्तर बातमी याप्रमाणे आहे की नागपूर महापालिकेतर्फे आयोजित राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत (एनसीएपी) शाश्वत बांधकाम व पाडकाम (सी अँड डी) मलबा व्यवस्थापन – नागपूर शहर याविषयावर वनामतीच्या सभागृहात चर्चासत्र आज (ता. 22) पार पडले. या चर्चासत्राचे उद्घाटन महापलिका आयुक्त तथा प्रशासक डॉ़ अभिजीत चौधरी यांच्या हस्ते झाले. या चर्चासत्राला महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, एलआयटीचे अधिष्ठाता डॉ. अतुल वैद्य, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी श्रीमती हेमा देशपांडे, नीरीच्या प्रधान शास्त्रज्ञ डॉ. संगीता गोयल, हैदराबाद सी अँड डी. वेस्ट प्रायव्हेट लिमीटेडचे महाव्यवस्थापक मोहम्मद नसुरुल्लाह, महापालिकेच्या सल्लागार डॉ. गीतांजली कौशिक, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार उपस्थित होते.