प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत अभियान अंतर्गत सत्कार समारंभाचे आयोजन
✍️सचिन मापुस्कर✍️
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
📞8698536457📞
श्रीवर्धन- प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत अभियान अंतर्गत आज, दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी श्रीवर्धन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पंचायत समिती श्रीवर्धन येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. गटविकास अधिकारी माननीय माधव जाधव साहेब उपस्थित होते. आणि त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात मा. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नारायणकर सर यांनी क्षयरोग निर्मूलनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बारा ग्रामपंचायतींना ब्राँझ मेडल (प्रमाणपत्र व मानचिन्ह) आणि मागील २ वर्ष सतत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तीन ग्रामपंचायतींना सिल्व्हर मेडल (प्रमाणपत्र व मानचिन्ह) देऊन त्यांची प्रशांसा केली. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनील थळे यांनी केले व श्री विजय पाटील यांनी क्षयरोग ची विस्तारित माहिती दिली. त्यानंतर कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांनी उपस्थित आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, तालुका समूह संघटक, आरोग्य सेवक आणि सेविका यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, संशयित क्षयरोग रुग्णांचे ग्रामस्तरावर सर्वेक्षण करून तात्काळ थुंकी नमुने प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवावेत. तपासणीत पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांवर त्वरित औषधोपचार सुरू करावेत, अशी सूचना करण्यात आली.
यावेळी सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामसभांमध्ये आरोग्य शिक्षणावर भर देत आशा कार्यकर्त्यांना क्षयरोग निर्मूलनात अधिक सक्रिय करण्याचे आवाहन केले. त्यामुळे सर्व ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त होण्यासाठी पुढाकार घेतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला कार्यक्रमाची सांगता तालुका आरोग्य सहायक मा. अनंत गायकर आणि आरोग्य सेवक अक्षय धांडे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.