गेल कंपनी च्या प्रवेशद्वारावर प्रकल्प ग्रस्तांचे आंदोलन
प्रकल्पग्रस्तना नोकरी व रोजंदारी पासून वंचित ठेवल्याने आंदोलन
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील उसर गेल इंडिया लि. कंपनीने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरी व रोजदांरीपासून वंचित ठेवल्याने संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीने साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे.
गेल इंडिया लि. कंपनीने शेतकऱ्यांची ४७५ एकर जमीन अत्यल्प दराने घेतली आहे. मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कायम स्वरूपी नोकरी नाहीच, परंतू ठेकेदार पद्धतीने सुध्दा रोजदांरी देण्यापासून स्थानिक प्रकल्पग्रस्तांना वंचित ठेवले आहे. मागील आंदोलनात १५० स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्याचा गेल इंडिया लि.कंपनी व्यवस्थापनाने आश्वासन दिले होते. परंतु त्यालाही कंपनी प्रशासनाने केराची टोपली दाखविली असून प्रकल्पग्रस्ताला नोकरी व रोजंदारी दिली नाही.
तसेच प्रकल्पग्रस्त यांना दिलेल्या मागण्याची पुर्तर्तेसाठी न केल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी व स्थानिक ग्रामस्थ बेरोजगारीने संप्तत झाले आहेत. त्यामुळे गेल इंडिया लि. उसर येथे प्रकल्पग्रस्त व स्थानिक ग्रामस्थ २३ एप्रिल पासून गेल इंडिया लि. उसर गेट समोर साखळी उपोषण आंदोलन छेदणार असा इशारा निवेदनाव्दारे कंपनी व्यवस्थापनास देण्यात आला होता.त्या नुसार सर्व प्रकल्पग्रस्त अध्यक्ष निलेश गायकर यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पग्रस्त व शेतकरी उपोषणास बसले आहेत.