राष्ट्रवादी विभागीय अध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश निजामपूर विभागात राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला जबरदस्त धक्का
नामदार भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली केला शिवसेनेत पक्षप्रवेश,
✍️सचिन पवार✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
माणगांव :-महाड विधानसभा मतदारसंघ माणगाव तालुका निजामपूर विभाग राष्ट्रवादी अध्यक्ष संदीप जाधव यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश निजामपूर विभागातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे सदर पक्ष प्रवेश करण्यात आला.संदीप जाधव यांच्या समवेत दिनेश भालेकर यांचा देखील पक्षप्रवेश घेण्यात आला संदीप जाधव हे निजामपूर विभागातील बाबू खानविलकर यांचे खास मित्र होते.कोणत्याही प्रकारची विकास कामे होत नाहीत राष्ट्रवादीचे नेते फक्त आश्वासनेच देत आहेत,त्यामुळे आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करत आहोत असे जाधव यांनी यावेळी सांगितले.या पक्षप्रवेश समारंभावेळी निजामपूर विभागातील शिवसेनेचे मनोज सावंत, गणेश समेळ, नितीन पवार, मंगेश सावंत, अविनाश नलावडे, गजानन मोहिते, राजा कदम, प्रकाश जंगम, सुरेंद्र पालांडे इत्यादी विभागातील शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.