वर्धा जिल्हात छापा टाकून, सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त.

आशीष अंबादे प्रतीनिधी
वर्धा:- जिल्हातील पुलगाव मध्ये मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूचा माल साठा करुन तो विक्री करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. अन्न आणि औषधी प्रशासन विभागाच्या पथकाने पुलगावच्या इंदिरा गांधी वार्ड आणी हिंगणघाट फैल परीसरातील दुकानावर धाड टाकून 76 हजार 880 रुपये किंमतीचा सुंगधीत तंबाखू, पान मसाला व स्वीट सुपारीचा मोठा साठा जप्त केला.
महाराष्ट्र शासनाने सुंगधीत तंबाखू, पान मसाला व स्वीट सुपारी इत्यादी अन्न पदार्थ विक्री, निर्मीती, वितरण आणी साठवणूक यावर प्रतिबंध लावलेला आहे. असे असताना संपुर्ण वर्धा जिल्हात आणी पुलगाव परीसरात आज मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने सुंगधीत तंबाखू, पान मसाला व स्वीट सुपारीची विक्री होत असल्याची माहिती पुलगाव येथील अन्न व औषधी विभागाला मिळाली. त्यावरुन पुलगावच्या इंदिरा वार्ड येथील महाकाली ट्रेडर्स व हिंगणघाट फैल येथील जय भोले ट्रेडर्स या दोन दुकानावर धाड टाकली. यात 116.59 किलो सुंगधीत तंबाखू, पान मसाला आणी स्वीट सुपारीचा साठा जप्त करण्यात आला. या व्यवसायीकांविरुद्ध पुलगाव पोलिस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता कलम 188, 273 व 328 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.