मांडवा कोळगाव समुद्रानजीक अनधिकृत बांधकाम व जेएसडब्ल्यू फ्लाय अ‍ॅश भराव

मांडवा कोळगाव समुद्रानजीक अनधिकृत बांधकाम व जेएसडब्ल्यू फ्लाय अ‍ॅश भराव

तक्रारीची पर्यावरण विभागाकडून दखल.
जिल्हाधिका-यांकडून मागविला अहवाल.

जे.एस. डब्लु कंपनीचा टाकाऊ (स्लॅग) अलिबाग तालुका नासविणार.

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- कोळगाव ता.अलिबाग येथील गट. क्रमांक 323 व इतर विविध गटात सीआरझेड नियमांचे उल्लंघन करणा-या अवैध बांधकामांविरुद्ध तसेच जेएसडब्ल्यू फ्लाय अ‍ॅशच्या अनधिकृत भरावाबाबत अनिल पंडीत,प्रातिनीधी बॉम्बे एनव्हारनमेंट ऍक्शन ग्रुप मुंबई यांनी दि. 20 जानेवारी 2025 रोजी व वासुदेव महादेव भंगरे तर्फे विलास गजानन बुरांडे यांनी दि. 25 फेब्रुवारी 2015 रोजी कोळगाव येथील ग.क्र. 320, 321 मधील अनधिकृत बांधकामांबाबत पर्यावरण विभागाकडे अर्ज केले होते. पर्यावरण विभागाने सदर तक्रार अर्जाची दखल घेवून जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष, जिल्हा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण
यांना पत्र पाठवून या संदर्भात तातडीने अहवाल मागितला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कोळगाव येथील ग.नं. 321 मध्ये तर न्यायाधिकरणाचे जैसे थे परिस्थीती कायम ठेवण्याचे आदेश असतानाही अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची माहिती तक्रारदार वासुदेव महादेव भंगरे यांनी दिली आहे.
जेएसडब्ल्यू फ्लाय अ‍ॅशच्या भरावाच्या तक्रारी अलिबाग तालुक्यात वाढत असून स्थनिक तलाठी, मंडळ अधिकारी व ग्रामस्थ यांनी संयुक्तरित्या केलेल्या पंचनाम्यामध्ये वारंवार ही गोष्ट रेकॉर्डवर येत असल्याने जिल्हा प्रषासनाने जेएसडब्ल्यू फ्लाय अ‍ॅशच्या अनधिकृत भरावांबाबत कंपनीवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केली आहे.
मंडळ अधिकारी सारळ व तलाठी सजा धोकवडे यांच्या दि. 7 मार्च 2025 च्या पंचनाम्यामध्ये अनिल पंडीत. प्रातिनीधी बॉम्बे एनव्हारनमेंट अक्षन ग्रुप मुंबई दि. 07/03/2025 रोजी हजर राहून तक्रारीच्या अनुषंगाने मौजे कोळगांव येथील गट क्र.323 या मिळकतीमध्ये जमीन मालक यांनी केलेल्या अनधिकृत भरावाच्या अनुषंगाने स्थळ पाहणी केली असता ‘सदर मिळकतीमध्ये सुमारे 70 मी. लांब 30मी. रूंद ×03मी. उंच असा जे.एस. उब्लु कंपनीचा टाकाऊ (स्लॅग) चा भराव’ केलेला दिसून येत आहे. त्यावर मुरुम मातीचा भर पसरलेला दिसुन येत आहे. तसेच सदरची मिळकत ही समुद्रा लगत असल्याने सि.आर. ब्लेड क्षेत्रामध्ये असल्याचे स्पष्ट दिसुन येत आहे. तसेच सदर मिळकत व त्या लगत असलेल्या गट क्र. 317 या मिळकती च्या सभोवताली सिमेंट काँक्रेटच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम केलेले दिसुन घेत आहे. सदर स्थळ पाहणीवेळी जमीन मालक अथवा त्यांचे प्रतिनीधी स्थळ पाहणी वेळी हजर नव्हते. सदर भरावाकथन व बांधकामबाबत जमीन मालक यांनी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेतल्याची दिसुन येत नाही असा उल्लेख स्पष्ट नपणे करण्यांत आलेला आहे.
पर्यावरण विभागासोबतच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाने तक्रारदार वासुदेव महादेव भंगरे यांच्या तक्रारी बाबत उप विभागीय अधिकारी यांना लिहीलेल्या पत्रामध्ये तक्रारदाराच्या अर्जाचे अवलोकन करुन प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळपाहणी व सखोल चौकशी करुन प्रस्तुत क्षेत्र सि.आर. झेड अधिसुचना 1991,2011 तसेच सुधारीत अधिसूचना 2019 च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास कार्यवाही करणेबाबत उक्त अधिसूचनेअन्वये कळविणेत आले आहे. तसेच पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986चे कलम 19 अ नुसार गुन्हयाची दखल घेण्याचे अधिकार संबंधित उपविभागीय अधिकारी यांना प्रदान केलेले आहेत. तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम, 1966चे कलम 52,54,55,56 व 57 नुसार कार्यवाही करणेकामी या जिल्हाधिकारी कार्यालयाचे परिपत्रक कार्यालयाचे परिपत्रक क्र. बिशोमोशा/कात-१/अधिकार प्रधान/एमआरटीपी/1966/कलम 52 ते 57/2023 नुसार सीआरझेड क्षेत्राकरीता उप विभागीय अधिकारी यांना अधिकार प्रधान करण्यात आले आहेत. तरी प्रस्तुत प्रकरणी तक्रारदार यांनी तक्रार अर्जामध्ये नमूद केलेल्या वस्तुस्थितीच्या अनुषंगाने उक्त शासन निर्णय तसेच परिपत्रकातील निर्देशानुसार तातडीने कार्यवाही करुन अर्जदार यांना आपले स्तरावरुन उचित उत्तर देण्यात यावे. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत या कार्यालयास अवगत करावे असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उप विभागीय अधिकारी यांना देण्यांत आले आहेत.