बहिरी देव स्पोर्ट राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धेत मालेगाव संघ विजेचा तर उपविजेचा सोलापूर संघ.
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील बहिरीदेव स्पोर्ट क्लब बहिरीचा पाडा यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत इस स्टॉक संघ मालेगाव विजेचा ठरला तर उपविजेचा अमीर मालशिरास सोलापूर संघ तसेच तृतीय क्रमांक दूध डेरी संघ पुणे, चतुर्थ क्रमांक टेमघर महाड रायगड जिल्हा हे संघ विजेचे ठरले स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू इस्तियाक मालेगाव, उत्कृष्ट शूटर अमीर काझी सोलापूर व उत्कृष्ट नेट मन विजय शासकीय दुध डेअरी पुणे या सर्व विजेचा संघांना भव्य ट्रॉफी पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले तसेच स्पर्धेत उल्लेखनीय कार्य केलेला खेळाडूंचा सन्मान सन्मान चिन्ह व पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
अलिबाग तालुक्यातील श्री बहिरी देव स्पोर्ट क्लब बहिरीचा पाडा यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेचा शुभारंभ रायगड जिल्हा शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी अनिल पाटील , सिद्धनाथ पाटील ,सत्य विजय पाटील , प्रेमनाथ पाटील ज्येष्ठ खेळाडू केशव पाटील भारतीय सैन्य दलातील आर्मी मध्ये कार्यरत असलेले ओमकार पाटील व आगरी भूषण पुरस्कार विजेचे बबन पाटील.
तसेच खारेपाट विभागातील सरपंच उपसरपंच सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व श्री बहिरी देव स्पोर्ट स्पोर्ट क्लब बहिरीचा पाडा मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी व सर्व खेळाडू व ग्रामस्थ मंडळ बहिरीचा पाडा मोठ्या संख्येने उपस्थित होता.
स्पर्धेत रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील नामवंत संघ सहभागी झाले होते सूत्रसंचालन विकास पाटील स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने क्रीडा प्रेक्षक उपस्थित होते पंचांची कामगिरी ज्येष्ठ खेळाडू तानाजी पाटील व अन्य राष्ट्रीय खेळाडूंनी पार पाडली कमलाकर पाटील विनायक पाटील यांनी सर्वाचे स्वागत केले.
सर्वसामान्यांच्या समस्या, सर्व सामान्यांचे प्रश्न
सर्वसामान्यांच्या बातम्यांनाच, आम्ही देतो महत्त्व
आज आपल्या विश्वासाबरोबरच मीडिया वार्ता न्यूजला गरज आहे, आपल्या मदतीची. आपली छोटीशी मदत या फेक न्यूजच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या बातम्यांना वाचा फोडून प्रामाणिकपणे काम करण्यासाठी लाखमोलाची ठरू शकते.