शिपुरकर आणि वाघरे शाळेचे घवघवीत यश

शिपुरकर आणि वाघरे शाळेचे घवघवीत यश

अनन्या तायडे रायगडमध्ये प्रथम तर आर्या फाटक तालुक्यात प्रथम

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :-माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे अभिनव शैक्षणिक उपक्रम राबविले जाणार्या सुधाकर नारायण शिपुरकर आणि गणेश यशवंत वाघरे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. गणित सुबोध परीक्षेत अनन्या गजानन तायडे ही विद्यार्थीनी रायगड जिल्ह्यात प्रथम तर आर्या मिलिंद फाटक ही तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. त्याबद्दल शाळा प्रशासन, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

सुधाकर नारायण शिपुरकर या शाळेच्या इयत्ता पाचवीतील
मिताली रघुनाथ जगदाळे, निर्मिती नितीन नाईक,
सुर्यकांत प्रशांत गायकवाड,
आरती प्रकाशन परमार तर गणेश यशवंत वाघरे या शाळेच्या अनन्या गजानन तायडे, सुहाना प्रतिक तेटगुरे, आर्या मिलिंद फाटक, कार्तिक कपिल अडे, साईश महेंद्र नाडकर, नक्ष प्रफुल्ल रोकडे हे १० विद्यार्थी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.

याच बरोबर रायगड जिल्हा गणित आणि विज्ञान अध्यापक मंडळाने आयोजित करण्यात आलेल्या गणित सुबोध परीक्षेत सुधाकर नारायण शिपूरकर प्री प्रायमरी अँड प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल इयत्ता पाचवीतील मिताली रघुनाथ जगदाळे याने रायगड जिल्हा सुबोध गणित शिष्यवृत्ती परीक्षेत चौथा क्रमांक तर सुर्यांश प्रशांत गायकवाड याने तालुका स्तरीय सहावा क्रमांक पटकावला आहे. तर विकास कुमार शालेंद्र पंडित, निर्मित नितीन नाईक, दुर्वा निलेश पाटील, स्मित महेंद्र नाडकर, मानवी अजय येलवे,
श्रीतेज विशाल वरुटे, जुबेर खाजाहुसेन बागवान, आदित्य अरुण हरणे, शुभ्रा महेंद्र वाईकर , मिकदाद नईम शेख हे १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

तसेच गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मिडीयम स्कूल मधील
इयत्ता ८ वीतील विद्यार्थी अनन्या गजानन तायडे रायगड जिल्हा शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी प्रथम क्रमांक, आर्या मिलिंद फाटक तालुका स्तरीय यशस्वी विद्यार्थी प्रथम क्रमांक तर सार्थक रवींद्र वाढवळ, वेद वासुदेव गुगळे, साईश महेंद्र नाडकर, रोशनी संतोष दोशी, सुहाना प्रतिक तेटगुरे, खुशी दीपक तेटगुरे, चिराग ठक्राराम देवासी, तन्वी राकेश पोवार, हर्ष संजय जाधव, मानव महेश मोरे, पियूष राजेश चौधरी, भूमी विनोद तांबे, हृदया प्रसन्न मोदी, रिया रावसाहेब कोळेकर, साईराज अनंत मढवी, राज प्रदीप सकपाळ, आर्या मंगेश करंजेकर, कार्तिक कृष्णा दिवेकर, स्वरूप संदीप सकपाळ, संस्कृती सुधीर मोरे, आर्या मंदार साळुंके, अंतरा मंदार साळुंके असे एकूण २४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

या सर्वांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे, सेक्रेटरी कृष्णा भाई गांधी, चेअरमन नरेंद्र गायकवाड, नितीन बामगुडे, डॉ. आबासाहेब पाटणकर, अशोक दादा साबळे विधी महाविद्यालयाचे चेअरमन ॲड. विनोद घायाळ, विठाबाई मारुती गोगावले नर्सिंग कॉलेजचे चेअरमन डॉ. गौतम राऊत यांनी अभिनंदन केले.