कोप्रोली शाळेत प्रवेशोत्सव साजरा

कोप्रोली शाळेत प्रवेशोत्सव साजरा

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील कोप्रोली येथील जिल्हा परिषद शाळेत नुकताच इयत्ता पहिली दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यामध्ये 5 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला आहे. यावेळी गुलाब पुष्प आणि खाऊ देऊन तसेच मनोरंजक खेळाद्वारे नवगतांचे शाळेमध्ये स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच मुख्याध्यापिका संध्या पाटील, विषय शिक्षिका ज्योती पाटील , उपशिक्षक नित्यनाथ म्हात्रे, श्रद्धा भोईर उपस्थित होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले.