भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे कामगार- कर्मचारी मारोती रेणेवाड व नारायण बत्तलवाड यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

40

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे कामगार- कर्मचारी मारोती रेणेवाड व नारायण बत्तलवाड यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

नांदेड – भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना प्रा.लि. देगाव- येळेगाव ता. अर्धापूर जि. नांदेड येथील दोन कामगार- कर्मचारी वयाची 58 वर्षे पूर्ण करुन प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्या दोन्ही कामगार- कर्मचार्‍यांचा दि. 4 मे 2025 रविवार रोजी दुपारी ठिक 01.00 वाजता भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखानास्थित नागेश्वर मंदिर प्रांगणात कारखान्यातील अधिकारी, कामगार- कर्मचारी यांच्यावतीने त्यांचा हृदय सत्कार करुन शुभेच्छारुपी निरोप देण्यात आला. यामध्ये सेवानिवृत्त कामगार- कर्मचारी मारोती तुकाराम रेणेवाड पाटणूरकर (मिल फिटर) 26 वर्षे सेवा, नारायण रामजी बत्तलवाड पाटणूरकर (फिटर सहाय्यक) 25 वर्षे सेवा यांचा समावेश होता.

सर्वप्रथम कारखान्याचे इंजिनिअर ऋषिकेश गड्डपवार, अजय कदम, डी.आर. जाधव, रोहन देशमुख, प्रकाश कावडकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा, पुष्पहार देऊन दोन्ही सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचा हृदय सत्कार करुन भावी आयुष्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. ते प्रमुख वक्ते म्हणून बोलताना आपल्या प्रास्ताविकपर भाषणात म्हणाले की, भारत देशासहीत जगातील कोणत्याही देशाची प्रगती ही कष्टकरी, कामगार- कर्मचारी व शेतकर्‍यांच्या मेहनतीवर अवलंबून असते म्हणून लोकशाहीर, साहित्य सम्राट, कॉ. अण्णाभाऊ साठे यांनी म्हटले आहे की, पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर तरली नसून ती कामगार, कष्टकरी, शेतकर्‍यांच्या तळहातावर तरली आहे, असे प्रतिपादन केले. पुढे बोलताना ते आपल्या भाषणात म्हणाले की, मारोती रेणेवाड व नारायणराव बत्तलवाड यांनी आपल्या सेवेमध्ये कारखान्यात प्रामाणिकपणे कर्तव्य बजावून खूप मोठे योगदान दिले असून ही आदर्शयुक्त बाब आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

या सत्कार सोहळा कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे इंजि. ऋषिकेश गड्डपवार, प्रकाश कावडकर, रोहन देशमुख, डी.आर. जाधव, अजय कदम, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, साहेबराव रेणेवाड, नामदेवराव तिडके, देविदास रेणेवाड, रोहीत मिसलवाड, कारखान्यातील कामगार- कर्मचारी जांबुवंत पवार, प्रल्हाद पांचाळ, रुद्राजी डोणगे, दामाजी गव्हाणे, शंकर संगतीरे, बालाजी जाधव, अशोक मुलंगे, गजानन जाधव, जगन कंकाळे, अशोकराव जाधव, रंगराव गाढे, बळीराम ढोरे, सुखदेव भांबरे, नरसिंगराव पाटील या कामगार- कर्मचार्‍यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर लगेचच सर्व उपस्थितांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला.