शेतकरी आंदोलन महाविकास आघाडी कळमेश्वर तालुका तर्फे चक्काजाम आंदोलन.

71

शेतकरी आंदोलन महाविकास आघाडी कळमेश्वर तालुका तर्फे चक्काजाम आंदोलन.

 Chakkajam agitation on behalf of Shetkari Andolan Mahavikas Aghadi Kalmeshwar taluka.

युवराज मेश्राम  प्रतिनिधी
कळमेश्वर:- काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, किसान विकास मोर्चातर्फे ब्राह्मणी फाटा कळमेश्वर येथे आमदार सुनील भाऊ केदार क्रीडा व पशुपालन मंत्री यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी सुनील केदार यांनी भाषणात शेतकरीविरोधी तिन्ही कायदे केंद्र सरकारने वापस घ्यावे कारण हे कायदे शेतकरीविरोधी असून कार्पोरेटर अदानी,अंबानी यांच्या हितार्थ केलेला आहे. गेल्या बहात्तर दिवसापासून दिल्लीला शेतकरी सविधान मार्गाने आंदोलन कड़कड़ित ठंडित करीत आहेत. परंतु हे केंद्र सरकार ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करीत असून या देशातील पोशिंदा शेतकऱ्यावर दडपशाहीचे राजकारण केंद्र सरकार करीत आहे असे विचार क्रीडा पशुपालन मंत्री सुनील केदार यांनी केले.

 Chakkajam agitation on behalf of Shetkari Andolan Mahavikas Aghadi Kalmeshwar taluka.
दिल्लीच्या शेतकऱ्याच्या या आंदोलनाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, किसान विकास मोर्चाने पाठिंबा दिलेला आहे. या चक्काजाम आंदोलनात शिवसेनेचे नेते राजूभाऊ हरणे यांनी सुद्धा आपले विचार मांडलेत. या आंदोलनात सक्रियतेने काँग्रेसचे मनोहर कुंभारे, बाबा पाटील, बाबा कोडे, राजू सुके, महेंद्र डोंगरे, नितीन ढोके,श्रावण भिंगार, विरेंद्र सिंग बैस,अशोक भागवत, सर्जू मंडपे, विलास मानकर, संजय धोंगडी हे होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाशजी गोतमारे, राहुल अंजनकर, खुशाल मांडलिक, युवराज मेश्राम, बबन वानखेडे, श्रीराम भिवगडे होते शिवसेनेचे प्रशांत इख़ार, मधुकर दळवी, मकासरे गुरुजी तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे दादाराव शिरसाठ, अरुण वाहने व पदाधिकारी त्याचप्रमाणे भारतीय मुक्ती मोर्चाचे अनिल बोडखे व पदाधिकारी त्याचप्रमाणे महा विकास आघाडीचे सरपंच , सदस्य, पंचायत समितीचे सभापती सदस्य नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष व सदस्य हजर होते आणि कळमेश्वर तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने बैलगाड्या व ट्रॅक्‍टर घेऊन चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले होते