गेटवे – मांडवा मार्गावरील जलवाहतूक वादळी वाऱ्यामुळे ठप्प, प्रवाशांचे हाल

गेटवे – मांडवा मार्गावरील जलवाहतूक वादळी वाऱ्यामुळे ठप्प, प्रवाशांचे हाल

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:-वादळी वारे व पाऊस असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आज गेटवे – मांडवा या जलमार्गावरील जलवाहतूक सेवा वातावरण सुरळीत होईपर्यंत बंद करण्यात आली आहे, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. तरी या मार्गाने प्रवास करताना प्रवाशांनी चौकशी करूनच प्रवास करावा, सेवा देणाऱ्या जलसंस्था यांच्या वतीने करण्यात आली आहे.
गेटवे – मांडवा अलिबाग या जलमार्गाने दररोज हजारो पर्यटक व इतर प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करत असतात, मात्र बुधवारी अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने आज गुरुवार दि. ८ मे रोजी या मार्गावरील जलवाहतूक वातावरण सुरळीत होईपर्यंत बंद करण्यात आली असल्याचे सांगितले आहे. यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत.