न्यू प्रगती शैक्षणिक संस्थेचा समाजोपयोगी उपक्रम – वृद्धाश्रम व अनाथालयास मदतीचा हात

50

न्यू प्रगती शैक्षणिक संस्थेचा समाजोपयोगी उपक्रम – वृद्धाश्रम व अनाथालयास मदतीचा हात

मिरा रोड : न्यू प्रगती शैक्षणिक संस्था (रजि.) ही संस्था गेल्या काही वर्षांपासून समाजातील तळागाळातील, विशेषतः आदिवासी पाड्यांमधील व गावागावातील गरजू मुलांना शिक्षणाची संधी देण्यासाठी कार्यरत आहे. ग्रामीण तसेच शहरातील वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.त्या साठी संस्थेच्या वतीने ठाणे, नालासोपारा,पालघर,मीरारोड अशा विविध परिसरामध्ये ऐकून 52 बालवड्या अंगणवाड्या काढल्या आहेत, यासोबतच महिलांना सक्षम बनवण्यासाठी संस्थेच्या वतीने वेळोवेळी विविध रोजगारक्षम प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येते, ज्यातून महिलांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त होते.

या सामाजिक जाणीवेच्या भाग म्हणून दिनांक २१ एप्रिल २०२५ रोजी मिरा रोड येथील पराश शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वृद्धाश्रम व मुलांचे अनाथालय यांना भेट देण्यात आली. या उपक्रमांतर्गत वृद्धाश्रम व अनाथालयातील गरजूंसाठी धान्य वाटप करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमात वृद्धाश्रमाचे संचालक मा. रुपेश पाटील यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करत, समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा कार्याची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाला न्यू प्रगती शैक्षणिक संस्थेच्या संचालिका मा. अनिता खरात मॅडम, पदाधिकारी मा. सुनील कांबळे, गणेश खरात सर, ममता चव्हाण मॅडम, मा.चंद्रकांत सोनवणे, मा.महेश गडांकुश यांच्यासह संस्थेचे इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संस्था भविष्यातही असे विविध सामाजिक उपक्रम राबवत राहणार असून, या कार्यात समाजातील जागरूक व दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन आर्थिक स्वरूपात संस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीमुळे अधिकाधिक गरजूंपर्यंत मदत पोहोचवता येईल आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवता येईल.