मुहूर्त नव्हे, गाळ काढा उमटे धरण संघर्ष ग्रुपचे प्रशासनाला निवेदन
संजय वेंगुर्लेकर यांना धरणाचे गढूळ पाणी देऊन केला शासनाचा निषेध
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- मुहूर्त नव्हे, गाळ काढा,, या विषयाच्या मथळ्याखाली उमटे धरणाचा गाळाच्या व डागडुजीच्या संदर्भात उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड यांनी आज जिल्हाधिकारी रायगड, तसेच रा, जि, परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले,
. सदरच्या निवेदनात दिनांक १४/०५/२०२४ रोजी उमटे धरण संघर्षग्रुप रायगड यांच्यावतीने निवेदनाद्वारे गाळ काढण्यासंदर्भात तसेच बंधाऱ्याची तात्काळ डागडुजी करण्याच्या बाबतीत मागणी केली होती. सदरचा पत्र व्यवहार करून १ वर्षे उलटूनही अद्यापही आपण गाळ काढण्याच्या कामाला शासनाकडून सुरूवात झालेली नाही. असे असतानाच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता (माणगांव) डी.ए.जाधव यांनी दिनांक १७/०३/२०२५ रोजी वृत्तपत्रामध्ये उमटे धरणाचा गाळ काढण्याच्या संदर्भात रक्कम रू. ८,८१,३५,६३१/- रूपयांची ई निविदा सुचना क्र. १२२० सन २०२४-२५ निवीदा प्रसिध्द केली आहे. शासनाकडून सलग तीन वेळा निविदा सुचना प्रसिध्द करूनही प्रत्यक्षात गाळ काढण्याच्या कामाला सुरूवात झालेली नाही.
सदरच्या उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या ४६ गावे व ३३ आदिवासी वाडयांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सद्यस्थितीत तीन दिवसांआड अशुध्द व मातीमिश्रीत पाणीपुरवठा होत असून नागरीकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
उमटे प्राधिकरण पाणी पुरवठा योजनेचे सविस्तर सर्वेक्षण करून योजनेच्या पुर्नस्थापनेचे व धरणाची क्षमता वाढविण्याचे काम महाराष्ट्र जमिन प्राधिकरणामार्फत करण्याचे दिनांक ३१/१०/२०२२ च्या मा. पालकमंत्री उदय सामंत पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या बैठकीत ठरविण्यात आले होते त्याप्रमाणे महाराष्ट्र जमिन प्राधिकरणाने नेमणुक केलेल्या तांत्रिक सल्लागारामार्फत अंदाजे २१५ कोटी रक्कमेचा एकत्रित प्रस्ताव सादर केला आहे त्यापैकी पाईप लाईनच्या कामास तांत्रिक मंजुरी प्राप्त असून धरणाच्या कामास तांत्रिक मंजुरी मिळणे बाकी आहे. अशा आशयाचे पत्र उपअभियंता व पाणीपुरवठा उपविभाग रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी दिनांक १४/११/२०२२ रोजीच्या पत्रानुसार कळविले आहे.
उमटे धरणाच्या विविध कामासाठी २१२ कोटी तसेच दिनांक १७/०३/२०२५ रोजीची इनिवीदा सुचना रक्कम रू.८,८१,३५,६३१/- (आठ कोटी एक्याऐंशी लाख पस्तीस हजार सहाशे एकतीस) मात्र ई-निविदा प्रसिध्द केलेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध असताना उमटे धरणाच्या विविध कामांना विलंब का होत आहे? उमटे धरणाच्या गाळाच्या व शुध्द पाण्याच्या बाबतीत नागरीकांना त्यांच्या मुलभुत हक्कांपासून जाणीवपुर्वक तुम्ही वंचित ठेवत असल्याची आमची पक्की धारणा झाली आहे.
उमटे धरणाचा गाळ आणि धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या आम्हा नागरीकांची अवस्था ही इसापनितीच्या पुस्तकातील कोल्हा आणि करकोच्याच्या “खिरीच्या गोष्टीप्रमाणे” अधिकाऱ्यांनी केली आहे. खीर आहे पण खाऊ शकत नाही ?रायगड जिल्हयामध्ये RCF, Gail, JSW, JNPT सारखे हजारो कोटीची उलाढाल करणारे उद्योग आहेत सदरच्या उद्योगांचा (कंपन्यांचा) सी.एस.आर. फंड निवडणुकीत वापरला जातो मात्र पिण्याचे पाणी जिथे मिळते त्या उमटे धरणावर का वापरला जावू शकत नाही, हिच मोठी शोकांतिका आहे.
शासनाच्या माध्यमातून जलजीवन मिशन च्या योजनेसाठी हजारो कोटी रूपयांच्या निधीचा धुरळा उडवला जात असताना उमटे धरणाचा गाळ काढण्यासाठी शासनाला निधी उपलब्ध होत नाही हे आमचे दुर्दैव आहे.
सदर उमटे धरणाचा गाळ काढण्यासाठी कोणतीही अडचण नाही तसेच गाळ काढणे कठीणही नाही मागच्या वर्षी आम्ही साामाजिक दृष्टया मदत घेवून गाळ काढण्यास सुरूवात केली होती. धरणातील हजारो ब्रास गाळ (माती) काढण्यात आली होती. सदरच्या धरणाची मालकी ही शासनाचीच असल्यामुळे परवानग्या व अडचणींचा प्रश्नच निर्माण होत नाही.
येथील जनतेचा पाणी प्रश्न शासनाने सोडवावा शासनाला गाळ काढण्याच्या संदर्भात स्थानिक पातळीवर मदत करायला आमचा उमटे धरण संघर्ष ग्रुप तसेच येथील सामाजिक संस्था तयार आहेत.
तरी शासनाने उमटे धरणातील गाळ काढण्याच्या मुहुर्त न बघता विशेष बाब म्हणून तात्काळ गाळ काढण्याच्या कामाला सुरूवात करावी.अशा आशयाचे निवेदन उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या वतीने देण्यात आले,
उमटे धरणाच्या गाळाच्या बाबतीत शासनाची उदासीनता दिसून येत आहे,रायगड जिल्हयामध्ये मोठ्या कंपन्या आहेत सदरच्या कंपन्यांचा सी.एस.आर. चा निधी उमटे सारख्या धरणाचा गाळ काढण्यासाठी का वापरला जावू शकत नाही?धरणातील गाळ काढणं हा जलजीवन योजनेत घोटाळे करण्याच्यापेक्षा सोप्प आहे, प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने दखल घेतली नाही तर संविधानिक मार्गाने आम्ही आंदोलन करणार,,,
अँड, राकेश नारायण पाटील
उमटे धरण संघर्ष ग्रुप, रायगड,