आ. समीरभाऊ कुणावार व आ. गिरीशजी व्यास यांच्या प्रमुख उपस्थिती भाजपा बूथ संपर्क अभियानाअंतर्गत हिंगणघाट शहराची मीटिंग संपन्न.

हिंगणघाट:- भारतीय जनता पार्टी तर्फे बूथ संपर्क अभियानाअंतर्गत हिंगणघाट शहरांमध्ये मीटिंग आयोजीत करण्यात आली होती. या मिटींगमध्ये बूथ स्तरावरील प्रत्येक कार्यकर्ता हा पक्ष वाढीच्या दृष्टीने जनतेशी अधिकाधिक संपर्क ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. सोबतच केंद्र शासनाच्या ज्या योजना आहे त्या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संपर्क कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी प्रत्येक कार्यकर्त्यांनी जिद्दीने व चिकाटीने पक्ष वाढीच्या दृष्टिकोनातून काम करावे अशा सूचना देण्यात आल्या. यावेळी मिटिंगच्या अध्यक्षस्थानी आमदार गिरीशजी व्यास, आमदार समीरभाऊ कुणावार यांचा प्रमुख उपस्थितीत हिंगणघाट नगर पालिकेचे नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, जिल्हा महामंत्री किशोरभाऊ दिघे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितिन मडावी, आशिष परबत, जिल्हा सचिव सुभाषजी कुंटेवार, भाजयुमो प्रदेश मंत्री अंकुश ठाकूर, शहर महामंत्री अमोल राऊत, दिनेश वर्मा, अनिल गहेरवार, राकेश शर्मा सोबतच हिंगणघाट शहराचे शक्ती केंद्रप्रमुख सन्माननीय नगरसेवक- नगरसेविका सदर कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा शहराध्यक्ष आशिष पर्बत यांनी केले व आभार राकेश शर्मा यांनी मांडले.