स्व सीताबाई शेंडे कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाहीची अनुष्का कामडी 79 टक्के घेऊन विज्ञान शाखेतून प्रथम

स्व सीताबाई शेंडे कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाहीची अनुष्का कामडी 79 टक्के घेऊन विज्ञान शाखेतून प्रथम

अमान क़ुरैशी
सिंदेवाही प्रतिनिधि
8275553131

सिंदेवाही: नुकत्याच घोषित झालेल्या वर्ग बारावीच्या बोर्डाच्या निकालात स्व सीताबाई शेंडे कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाहीची विद्यार्थिनी कुमारी अनुष्का कामडी हिने विज्ञान शाखेत सर्वाधिक गुण मिळवून पहिली आली.
संत गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ सिंदेवाही द्वारा संचालित स्व.सीताबाई शेंडे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय सिंदेवाही यांचा एच एस सी चा 2025 विज्ञान शाखेचा वर्ग बारावीचा निकाल हा 92 टक्के लागला असून विज्ञान शाखेतून अनुष्का कामडी हिने 79 टक्के घेऊन प्रथम क्रमांक व कला शाखेतून प्रतिभा जान्नेवार 70 टक्के घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडील,संस्थापक डॉ.के. ए. शेंडे साहेब, प्राचार्य व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना दिले आहे.