मोहम्मद आकील बगदादी यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक व उर्दू गझल मराठी कवी पुरस्काराने सन्मानित

मोहम्मद आकील बगदादी यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक व उर्दू गझल मराठी कवी पुरस्काराने सन्मानित

✍️सचिन सतीश मापुस्कर✍️
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
📞8698536457📞

दिघी- श्रीवर्धन तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा आराठी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोहम्मद आकील मोहम्मद अली बगदादी यांना दिनांक २६/४/२०२५ रोजी माणगाव तालुक्यातील अँड हारून सोलकर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज साई या ठिकाणी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेतर्फे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जूनियर कॉलेज तुडील चे अध्यक्ष इकबाल चांदले यांच्या हस्ते देण्यात आला. बगदादी सरांनी आपले आयुष्य सुजाण विद्यार्थी घडवण्यासाठी अर्पण करून उत्तम नागरिक अनेक डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, प्राध्यापक घडवले आहेत. ते आपल्या पेश्याशी एकनिष्ठ असून उत्तम समाजसेवक ही आहेत. त्याचप्रमाणे ते उत्तम उर्दू,उत्तम मराठी कवी व उत्तम लेखकही आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना अध्यक्ष एम. ए. गफ्फार उपस्थित होते. या कार्यक्रमाला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. आदिती ताई तटकरे, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, माणगाव पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी सुरेखा तांबट मॅडम आदी मान्यवरांसह शिक्षक शिक्षिका पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्याचप्रमाणे दिनांक २३/०२/२०२५ रोजी चिपळूण येथील सावरकर सभागृह जिल्हा रत्नागिरी येथे झालेल्या ललितकला साहित्य अकाडमी फाउंडेशन ठाणे च्या वतीने उर्दू गझल व मराठी कवी
म्हणून श्रीवर्धन तालुक्यातुन श्री. मोहम्मद अकील बगदादी मुख्याध्यापक रायगड जिल्हा परिषद शाळा आराठी उर्दू यांना अँवार्ड देऊन गौरविण्यात आले.