साहित्यिक रमेश धनावडे यांच्या ‘असेच काहीतरी’ या पुस्तकाचे प्रकाशन!

साहित्यिक रमेश धनावडे यांच्या ‘असेच काहीतरी’ या पुस्तकाचे प्रकाशन!

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- साहित्यिक रमेश धनावडे यांच्या ‘असेच काहीतरी’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच ज्येष्ठ गझलकार व साहित्यिक ए.के. शेख यांच्या हस्ते व ज्येष्ठ साहित्यिक व कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्हा संपर्कप्रमुख एल. बी. पाटील, को.म.सा.प. अलिबाग शाखा अध्यक्षा व रायगड जिल्हा उपाध्यक्षा सुजाता पाटील, साहित्यिक रोहिदास पोटे, साहित्यिक सुभाष कटकदौंड, मुरुड को.म.सा.प. संपर्कप्रमुख संजय गुंजाळ, रायगड जिल्हा पत्रकार संघ उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, स्त्रीरोग तज्ञ व साहित्यिक डॉ. चंद्रकांत वाजे, साहित्य संपदा संस्थापक व साहित्यिक वैभव धनावडे, पूनम धनावडे आणि ॲड. विलास नाईक व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडले.

रमेश प्रभाकर धनावडे हे उच्च शिक्षित असून ते रिलायन्स इंडस्ट्रीज नागोठणे येथे डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. आजवर त्यांचे मनतरंग काव्यसंग्रह, ऊर्मी चारोळी संग्रह, जीवनगाणे ललितलेख संग्रह, कवितेच्या सुरातून हा लेखसंग्रह ही पुस्तके प्रकाशित आहेत.

त्याच्या अनेक दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या कथा, लेख आणि कविता प्रसिद्ध होत असतात.

रमेश धनावडे यांना आजवर रायगड भूषण सह अनेक पुरस्कार लाभले आहेत.

रमेश धनावडे यांचे असेच काहीतरी हे पुस्तक मराठी साहित्यामधील एक वेगळा प्रकार आहे. “सहज सोपे वाटणारे हे लिखाण चिंतन करण्याजोगे आहे. त्यांनी निर्माण केलेल्या साहित्यात एक गर्भित अर्थ, मिश्किलपणा व ग्राफिटी सारखा प्रकार आपणास अनुभव मिळतो व त्याने रसिक वाचक निश्चितच खुश होतील” असे ज्येष्ठ गझलकार एके शेख यांनी म्हटले आहे. तसेच या पुस्तकाचे उपस्थित सर्व मान्यवरांनी भरभरून कौतुक केले आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास साहित्यसंपदा परिवार, कोकण मराठी साहित्य परिषद परिवार तसेच अनेक साहित्यिक व साहित्य प्रेमी उपस्थित होते.