रोहयो योजनेअंतर्गत जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन

रोहयो योजनेअंतर्गत जिल्ह्यात शिबिरांचे आयोजन

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी शिबिरे आयोजित करून वैयक्तिक लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. सदर शिबिरे १६ मे पर्यंत घेण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत स्तरावर जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरांमध्ये सहभागी होऊन वैयक्तिक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी केले आहे. या शिबिरांचे तालुकास्तरावर आयोजन करण्यात येणार आहे.

वैयक्तिक लाभाच्या योजना राबवून रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना रोजगार निर्मिती करण्यात येते. शोषखड्डा, शौचालय, घरकुल, विहिरी, फळबाग, वृक्ष लागवड, शेळीपालन शेड, कुक्कुटपालन शेड, गुरांचा गोठा, शेतीची बांध बंदिस्ती व दुरुस्ती या वैयक्तिक लाभाच्या योजनेतून रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार निर्मिती करण्यात येते. यामुळे वैयक्तिक लाभाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या शिबिरांचे माध्यमातून वैयक्तिक लाभार्थ्यांची निवड करून, या कामांमधून रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ग्रामपंचायतींनी गावातील जास्तीत जास्त नागरिकांना योजनेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी केले आहे.
……………..