महेश गायकवाडयांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या फीमाफी विरोधात छेडलेल्या आंदोलनाला यश.

63

महेश गायकवाडयांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या फीमाफी विरोधात छेडलेल्या आंदोलनाला यश.

 

कल्याण (प्रतिनिधी अस्मिता सकपाळ) :- कोरोना संपुष्टातयेत आहे, परंतु त्याने घडविलेले दुष्परिणाम संपुष्टात यायचं नाव घेत नाही.अनेक जण बेरोजगार झाले, बऱ्याच गृहिणी कामावाचून घरीबसलेल्या आहेत.अनेकांचे उद्योगधंदे बंद पडले आहेत. अशातच माणसाच्या मुलभुत गरजा माणसांना भागविल्या शिवाय पर्याय नाही. परंतु, त्यासुद्धा भागविणे सामान्य माणसाला शक्य राहिल्या नाहीत. अशातच मुलाचं शिक्षण आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक फी प्रत्येक शाळा प्रशासन पालकांकडे फीसाठी तगादा लावत आहे, काही पालक जे समर्थ आहेत, ते फी भरून मोकळे झालेत. परंतु ज्यांची परिस्थिती फी भरण्यासारखी नाही आणि मुलांचं शिक्षणही थांबवायचं नाही. अशा हॉली क्रॉस शाळा नंदिवली कल्याण पूर्व यातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी कल्याण चे नगरसेवक महेश गायकवाड यांना पालकांचे नेतृत्व करण्याचे निवेदन दिले व शाळा प्रशासनाशी फी मध्ये सवलत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. त्या प्रमाणे आज हॉली क्रॉस शाळेच्या व्यवस्थापनाशी महेश गायकवाड नगरसेवक, नंदिवलीचे रामदास ढोणे विभागप्रमुख, संतोष नावगिरे शाखाप्रमुख, शंकर पाटील उपविभागप्रमुख, सौ. रीना ढोणे, सुभाष ढोणे, दत्ता शिंदे, प्रशांत बोटे शाखाप्रमुख व पालक आदींनी चर्चा केली व शाळेची शैक्षणिक फी ४०% माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय ज्यांच्या घरात कोरोनामुळे कोणाचा मृत्यू, अथवा कोरोना झाल्यामुळे उपचारासाठी खर्च झाला असला कारणाने पूर्ण फी माफीचा निर्णय घेण्यात आला.

चर्चा संपल्यानंतर शाळेचे चेअरमन अर्जुन नायर यांचे आभार मानण्यात आले व शाळा प्रांगणात सर्व पालकांसमोर शाळेने घेतलेले निर्णय महेश गायकवाड यांनी जाहीर केली. शेवटी सर्व पालकवर्गाने महेश गायकवाड आणि सर्व शिवसैनिक कार्यकर्त्यांचे आभार मानले.