पीएनपी संस्थेत गितांजली शेट्टे ९५.६०% गुण मिळवून प्रथम
पीएनपी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा निकाल १०० %
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- रायगड जिल्हयातील सर्व पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले आहे.
पीएनपी एज्युकेशन सोसायटीमध्ये होली चाईल्ड सीबीएसई स्कूल वेश्वीची विद्यार्थिनी गितांजली शेट्टे ९५. ६० टक्के गुण मिळवून संस्थेत प्रथम आली.
मराठी माध्यम माध्यमिक शाळा वेश्वी गोंधळपाडा शाळेची विद्यार्थिनी अनन्या अशोककुमार निर्मल ८८. ८० टक्के गुण मिळवून प्रथम, माध्यमिक शाळा रोहा तळाघर शाळेची विद्यार्थी प्रीत धामणसे ८६.४० टक्के गुण मिळवून द्वितीय, तर माध्यमिक शाळा बीड कर्जत विद्यार्थी गौरव सुरेश लोभी ८६.२० टक्के गुण मिळवून तृतीय आलेला आहे.
तर इंग्रजी माध्यमांमध्ये होली चाईल्ड इंग्लिश मिडियम स्कूल वेश्वीची विद्यार्थिनी आर्या अशोक बुरांगे ९५.४० टक्के गुण मिळवून प्रथम, मान्यता मंगेश म्हात्रे ९४ टक्के गुण मिळवून द्वितीय तर श्रुष्टि किशोऱ राऊत ९३.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे.
पीएनपी सीबीएसई स्कूलचा निकाल ९२ टक्के लागला असून गितांजली शेट्टे ९५. ६० टक्के गुण मिळवून प्रथम, अल्फिया बिरादर ९४.४ टक्के गुण मिळवून द्वितीय तर ऋतुजा बांधणकर ८८.२० टक्के गुण मिळवून तृतीय आलेली आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आ. जयंत पाटील, खजिनदार नृपाल पाटील, कार्यवाह चित्रलेखा पाटील, सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींकडून अभिनंदन करण्यात आले.