किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनीकेली आदिवासी महिलांची पाण्याची सोय

किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनीकेली आदिवासी महिलांची पाण्याची सोय

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी किहीम आदिवासी वाडीवरील महिलांना नळाद्वारे पाणी देण्याचा शब्द दिला होता, तो शब्द गुरुवार दि. १५ मे रोजी पूर्ण करत नळ पाणीपुरवठा योजनेचा नळांना पाणी सुरू करून मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले.
अलिबाग तालुक्यातील किहीम आदिवासी वाडी येथील महिलांना पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालअपेष्टा सहन करत डोक्यावर हंडा घेऊन लांबून पाणी वाहून आणावे वाहत होते, याबाबत आदिवासी महिलांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना व शासकीय दरबारी आपल्या व्यथा मांडल्या होत्या, पण त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले होते.या बाबत किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या कडे आमच्या पाण्याच्या होणाऱ्या गैरसोयीबाबतीत सांगितले असता त्यांनी काही दिवसांत नळाद्वारे पाणी तुमच्या दारात आणणार व तुमच्या डोक्यावरील हंडा उतरविणार, असे वचन दिले होते तो दिलेला शब्द आज पूर्ण केला आहे.
यावेळी किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी सांगितले की, मी माझे कर्तव्य व जबाबदारी पार पाडली आहे, या आदिवासी महिलांना यापूर्वी पाण्याची व्यवस्था करण्यात अपयशी ठरले, पण मी या महिलांना लवकरात लवकर नळाद्वारे पाणी तुमच्या दारात आणणार आहे, असा शब्द दिला होता तो शब्द पूर्ण केला, आज मी या महिलांच्या डोक्यावरून हंडा उतरविला आहे, याचा मला आनंद आहे, येत्या काही दिवसांत विविध विकासकामे व विविध प्रकारच्या योजना शासन स्तरावर मंजूर करून आणल्या आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत, लवकरच त्याही पूर्ण करणार असल्याचे सांगितले.
या उद्धाटन कार्यक्रमाला किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड, उपसरपंच मिलिंद पडवळ, ग्रामपंचायत सदस्या कल्पिता आमले, निधी काठे तसेच किहीम आदिवासी वाडी येथील महिला व पुरुष बांधव तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.