आशिर्वाद फाउंडेशन तर्फे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ

आशिर्वाद फाउंडेशन तर्फे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व दहावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ

✍️सचिन सतीश मापुस्कर✍️
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
📞8698536457📞

दिघी -दिनांक १५ मे २०२०५ रोजी दिवेआगर येथील मराठा समाज मंदिरामध्ये मराठा समाजातील १ली ते १०वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आशीर्वाद फाउंडेशन तर्फे करण्यात आले. तसेच यावर्षी दहावीच्या परीक्षेत उज्वल यश मिळवून प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थिनीचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या उपक्रमासाठी आशिर्वाद फाउंडेशनचे श्री. रामकृष्ण चव्हाण, निखिल रिळकर, अमित सावंत आणि राकेश तोडणकर उपस्थित होते. एकूण १६ विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
आशीर्वाद फाउंडेशनचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देऊन त्यांना यशस्वी भवितव्याची दिशा दाखवणे. अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळावा आणि पुढे जाण्याची प्रेरणा मिळावी, हीच अपेक्षा आहे. यासाठी आशीर्वाद फाउंडेशन श्रीवर्धन म्हसळा तालुक्यांमध्ये विविध उपक्रम राबवत असते
शिक्षण हेच प्रगतीचे खरे साधन आहे असा आशीर्वाद फाउंडेशन चा ठाम विश्वास आहे योग्य मार्गदर्शन आणि सुविधा मिळाल्यास ग्रामीण भागातील मुलेही मोठ्या उंचीवर जाऊ शकतात. आशिर्वाद फाउंडेशन अशा अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी उपक्रमांतून समाजातील सकारात्मक बदलासाठी सातत्याने कार्यरत आहे. भविष्यातही असेच अनेक शैक्षणिक उपक्रम राबवण्याचा आशीर्वाद फाउंडेशन चा संकल्प आहे. सर्वांच्या सहकार्याने हा प्रवास अधिक व्यापक आणि यशस्वी व्हावा, हीच आशीर्वाद फाउंडेशन ची मनापासून इच्छा आहे.