Inauguration of Kabaddi competition at Bhosa by Karya Samrat MLA Sameerbhau Kunawar
Inauguration of Kabaddi competition at Bhosa by Karya Samrat MLA Sameerbhau Kunawar

कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते भोसा येथे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन.

 Inauguration of Kabaddi competition at Bhosa by Karya Samrat MLA Sameerbhau Kunawar
प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी

हिंगणघाट:- हिंगणघाट तालूक्यातील भोसा येथे आज दिनांक 06  फेब्रुवारीला कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते हनुमान व्यायाम मंडळ तर्फे भोसा येथे कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन. भारतीय व देशी खेळांना प्रोत्साहन देण्याकरिता कबड्डी स्पर्धेचे आयोजन हे अभिनंदनीय व प्रशंसनीय बाब आहे या भारतीय खेळा मधण देशाचे नाव लौकीक करण्याकरिता स्थानिक स्तरातून अशा स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट क्रिडापटू तयार होत असतात.

अशा प्रकारच्या खेळा मधून खेळाडूंमध्ये संघभावना तर निर्माण होतेच परंतु दैनंदिन खेळ खेळल्यामुळे एक आरोग्य वाढवून आरोग्य संपन्न पिढी भविष्यामध्ये तयार होण्यास अशा प्रकारच्या क्रीडास्पर्धा हात भार लावत असतात.
अशा प्रकारचे मनोगत कार्यसम्राट समीरभाऊ कुणावार यांनी व्यक्त केले.

 Inauguration of Kabaddi competition at Bhosa by Karya Samrat MLA Sameerbhau Kunawar
सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा.कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावार, प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा महामंत्री  किशोरभाऊ दिघे, विशेष अतिथी म्हणून संजयजी देहणे, योगेश भाऊ फुसे, सरपंच सौ. पिंकी ताई अंड्रस्कर, उपसरपंच सौ. नमिता ताई महांतरे, सरपंच रोशन भाऊ पांगुळ, ज्ञानेश्वर राव दांडेकर इत्यादी मान्यवर व असंख्य गावकरी मंडळी सदर कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेशभाऊ अवचट यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेशभाऊ जाधव यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here