75 वर्षाचा रुग्णास लावली वैधता संपलेली सलाइन. रुग्णालयाचा अजब कारभार.

प्राप्त माहिती नुसार पेठ वडगाव ता. हातकणंगले येथील महादेव खंदारे वय 75 यांना शुक्रवारी सकाळी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांना डिसेंबर 2020 हे वैधता संपलेले सलाइन लावण्याचा प्रकार रात्री उशिरा घडला. याबाबतचा त्यांचा मुलगा अक्षय खंदारे याने जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे.
विशेष म्हणजे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांसोबतच हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. या सलाइनने तुमचा रुग्ण दगावला का ? असे म्हणून खंदारे यांचाच आवाज दाबण्याचा प्रकार झाला. याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली पण त्याची दखल घेतली नाही. या सलाइनमुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास दूधगंगा इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील डॉक्टर जबाबदार असतील, असे या अर्जात म्हंटले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रुग्णालयातील बेजबादारपणा आणि निष्काळजीपणा उघडकीस आला आहे.