मुंबई महानगरपालिकेने काढलेल्या तंदूर रोटी बंदीच्या आदेशाचे हॉटेल व्यवसायिककडून सर्रास उलंघन.

मुंबई महानगरपालिकेने काढलेल्या तंदूर रोटी बंदीच्या आदेशाचे हॉटेल व्यवसायिककडून सर्रास उलंघन.

✍️ पप्पू वि.नायर ✍️
मुंबई शहर प्रतिनिधी
मो :- 7304654862

मुंबई :- काहीच दिवसांपूर्वी मुंबई महानगर पालिकेने हॉटेल व्यवसायकांना दूषित पर्यावरणाच्या व होणाऱ्या पोल्युशन मुळे तंदूर रोटी वर मनाई चे आदेश देण्यात आले होते. व त्यावर शिक्कामोर्तब करून तसा जी आर ही काढला होता. पण त्याचे हॉटेल व्यवसायिकांकडून केराची टोपली दाखवण्याचा सहसा प्रकार गोरेगांव पश्चिम मधे पहावयास मिळाला. प्रेम नगर मधील हॉटेल सिद्धेश, व एस व्ही रोड वरील हॉटेल राज आणि बऱ्याच ठिकाणी तंदूर रोटी अजून बंद झालेल्याच पहावयास मिळत नाही.

हॉटेल व्यवसायकांना पत्रकाराने या संधर्भात विचारणा केल्यावर धक्कादायक उत्तर समोर आले कि तंदूर रोटी चालू केली आहे, त्याबद्दल आम्हांला काही रक्कम हफ्त्याच्या स्वरूपात द्यावी लागते. आता असेच जर पालिकेचे अधिकारी परस्पर हॉटेल व्यवसायिकांकडून हफ्ता घेत असतील तर मुंबईत तंदूर रोटी बंदीच्या मुंबई महानगर पालिकेच्या एजेंड्याचे काय होणार, हा विषय पालिका प्रशासन गांभीयाने घेणार का असा सवाल आता जन माणसात पडू लागलाय, काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे पालिका प्रशासन बदनाम होऊ लागली आहे, त्याचा फायदा अशे हॉटेल व्यावसायिक घेताना दिसते.

आता तरी पालिका प्रशासनाने या विषयाचा गंभीरतेने अभ्यास करून ठोस पाऊले उचलावी लागतील जेणे करून जे हॉटेल व्यावसायिक आदेशाचा उलंघन करून जर असे करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई होण्याची गरज आहे, व भविष्यात अशा चुका होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. त्याच बरोबर जे कोणी भ्रष्ट अधिकारी असतील त्यांना तातडीने निलंबित केलं पाहिजे. असं आमचं ठाम मत आहे. सदर महापालिकेने गोरेगांव मधल्या सर्व हॉटेल्स वर धाडी टाकून जो कोणी हॉटेल वाला यामध्ये आदेशाचं उलंघन करताना आढळून आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करून त्याचं हॉटेल कायमच सील करण्यात यावं जेणेकरून या कारवाईमुळे अन्य हॉटेल व्यावसायिक अशी चूक भविष्यात कारणात नाहीत व पालिका प्रशासनाच्या आदेशाचे पालन करतील.