महाराष्ट्र वनविभाग व नागाव ग्रामपंचायतीचा सामंजस्य करार
नागाव बीचला पर्यावरण पुरक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ बनविण्याचा निर्धार
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- ब्लू फलॅग हे प्रतिष्ठीत आंतराराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागाव बीच ला पर्यावरण पुरक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ बनविण्याचा निर्धार महाराष्टॄ वनविभाग व नागाव ग्रामपंचायतीच्या सामंजस्य करार माथेरान येथे नुतन वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उध्दाटन प्रसंगी करण्यात आला.
माथेरान येथे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नुतन वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उध्दाटन कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी महाराष्ट्र वनविभाग आणि नागाव ग्रामपंचायत यांच्यात एक महत्वपुर्ण सामजस्य करार करण्यात आला. या कराराचा उद्देश नागाव बीचला ब्लू फलॅग हे प्रतिष्ठीत आंतराराष्ट्रीय प्रमाणपत्र प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागाव बीच ला पर्यावरण पुरक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ बनविण्याचा निर्धार महाराष्टॄ वनविभाग व नागाव ग्रामपंचायतीच्या सामंजस्य कराराने करण्यात आला. या करारावर प्रमुख अतिथी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. या प्रसंगी जिल्हाचे वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, वनविभागाचे प्रतिनिधी, पर्यावरण तज्ञ, तसेच स्थानिक नेते मंडळी या कार्यक्रमास उपस्थित होते. ब्लू फलॅग हे प्रतिष्ठीत आंतराराष्ट्रीय पर्यावरण सन्मानचिन्ह असून या माध्यमातून स्वच्छता, सुरक्षितता, आणि पर्यावरणीय शाश्वततेच्या जागतीक निकषांची पुर्तता करणार्या समुद्र किनारांना दिली जाते.
यावेळी राज्य वनमंत्री गणेश नाईक यांनी नमुद केले की, हा पुढाकार राज्याचा पर्यटन विकास धोरणाशी सुसंगत असून महाराष्ट्राच्या उच्च दर्जाया इको-पर्यटनाला चालना देणारा आहे असे म्हटले तसेच नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. तर नागाव ग्रा.प. सरपंच हर्षदा मयेकर यांनी या भागीदारीचे स्वागत करताना म्हटले की, यामुळे नागाव बीचच्या शाश्वत विकासासाठी नवीन दारे उघडतील, ज्यात स्थानिक रोजगार संधी आणि जागतिक ओळख यांच्या समावेश असेल.
महाराष्टॄ वनविभाग व नागाव ग्रामपंचायतीच्या सामंजस्य करारासाठी अलिबागचे उपवनसंरक्षक राहूल पाटील यांनी महत्वपुर्ण भुमिका बजावली, तसेच वनविभागाच्या पुर्ण सहकार्याची ग्वाही दिली. या करारा अंतर्गत ग्रामपंचायत व वनविभाग यांच्या सयुक्त विदयमोन स्वच्छता, जैवविविधता संवर्धन, सांडपाण्याचे व्यवस्थापन, सुरक्षीतता, आणि पर्यटन सोयीसुविधा यावर विशेष भर दिला जाईल. जर हा करार यशस्वीपणे राबविल्यास नागाव बीच ब्लू फलॅग हे प्रतिष्ठीत आंतराराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळविणारा भारतातील 14 वा आणि महाराष्ट्रातील पहिला समुद्र किनारा ठरेल. ज्यामुळे रायगउ जिल्हाचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर उंचावेल.